Asha Bhosle यांचा मुलगा Anand ची तब्येत बिघडली, अचानक बेशुद्ध झाल्याने दुबईतील रुग्णालयात करण्यात आले दाखल
जमिनीवर पडल्याने त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या मुलाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले (Anand Bhosle) यांची प्रकृती खालावली असून त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आनंदची तब्येत अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध पडला व जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्याने त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांना आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हे प्रकरण तात्काळ नसून काही दिवसापूर्वीचे आहे. सांगितले जात आहे की, काही वेळापूर्वी आनंद अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला आणि अचानक बेशुद्ध पडल्याचे पाहून सर्वजण अस्वस्थ झाले. जमिनीवर पडल्यामुळे आनंदला दुखापतही झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. (हेही वाचा - Ranbir-Alia Wedding: कोलकात्यात चाहत्यांनी रणबीर-आलियाचे लग्न केले थाटात साजरे; अभिनेत्रीला दिले माँ दुर्गेचे रूप, पहा फोटोज)
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या आशा भोसले त्यांचा मुलगा आनंदसोबत असून त्यांची काळजी घेत आहेत. मात्र, आनंदला किती काळ रुग्णालयात ठेवण्यात येईल, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेले नाही.
आशा भोसले यांनी त्यांच्या व्यावसायिक जीवनात उंची गाठली होती. तर दुसरीकडे त्यांचे वैयक्तिक जीवन संकटांनी भरलेले होते. आशा भोसले यांना तीन मुले (दोन मुले आणि एक मुलगी) होती. आशा यांच्या मोठ्या मुलाचे नाव हेमंत आणि मुलीचे नाव वर्षा होते. जे आता या जगात नाहीत. हेमंतचा कर्करोगाने मृत्यू झाला, तर वर्षा हिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. अशातचं आता आशा यांना धाकटा मुलगा आनंदच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे.