आयर्न मॅन मिलिंद सोमण ने घरच्या घरी पिकवला भाजीपाला; पहा खास व्हिडिओ

सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. मिलिंद सोशल मीडियावर आपले फिटनेस फोटो तसेच वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोमणने घरच्या घरी काही फळभाज्यांची शेती (Farming Video) केलेली पाहायला मिळत आहे. यात त्याने काकडी आणि दोडका हातात घेऊन फोटो शेअर केला आहे.

Milind Soman (PC - Instagram)

सुप्रसिद्ध मॉडेल, अभिनेता आणि आयर्न मॅन मिलिंद सोमण (Milind Soman) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. मिलिंद सोशल मीडियावर आपले फिटनेस फोटो तसेच वर्कआऊट करतानाचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतो. दरम्यान, मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सोमणने घरच्या घरी काही फळभाज्यांची शेती (Farming Video) केलेली पाहायला मिळत आहे. यात त्याने काकडी आणि दोडका हातात घेऊन फोटो शेअर केला आहे.

या व्हिडिओजमधून मिलिंद सोमणला फिटनेससोबत गार्डनिंगचीही आवड असल्याचं पाहायला मिळतयं. मिलिंद सोमणने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटल आहे की, 'अखेर एक लांब दाढी असलेला शेतकरी, अंकिताची इच्छा होती. स्वत:च्या हाताने उगवलेल्या भाज्या खाण्यात खरंच एक आनंद आहे. लॉकडाउनमध्ये एक लहानसं ग्रीन हाऊस, भाज्यांचं घरं मी उभा केलं,' असंही सोमणने म्हटलं आहे. (हेही वाचा - Gulabo Sitabo Movie Review: अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट ‘या’ कारणांसाठी जरूर पहा; उत्तम अभिनय, दिग्दर्शनासोबत लपला आहे सामाजिक संदेश)

 

View this post on Instagram

 

Finally a Bearded farmer as @ankita_earthy wanted ! Happiness really is growing your own food ❤️❤️ Built a small green house or ‘Sabzee ka Ghar’ as the caretaker calls it, just before lockdown and now it’s just green, green, green 😀 and a bit of purple, red and yellow too ! . . . #happiness #food #vegetables #green #fitness #health #love 📸 little wife :)

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

 

View this post on Instagram

 

How many things can you do with a melon ? Before you eat it 🤪 I eat fruits every morning, whatever is seasonal, a whole watermelon, a whole papaya, 5-6 mangoes, some bananas, yes all together 🙈 sometimes it takes me an hour!!! And then I rub the skins on my face :) . . . #thursday #thursdaymotivation #thoughtfulthursday #fitness #health #healthyliving #healthylifestyle #fruit #love #loveyourself #wellness #fitnessaddict 📸 @ankita_earthy

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning) on

मिलिंद सोमणचा फिटनेस सर्वचं तरुणांना प्रेरणा देणारा आहे. वयाची पन्नाशी उलटलेली असतानाही मिलिंद सोमण आजही तितकाच फिट आहे. तरुणांना लाजवेल अशी त्याची बॉडी आणि फिटनेस आहे. मिलिंद अनेकवेळा त्याच्या वर्कआऊटचे व्हिडिओ पोस्ट करतो आणि त्याच्या चाहत्यांना हे वर्कआऊट करण्यासाठी चॅलेंज देत असतो. मिलिंद बरोबरचं त्याची पत्नी अकिंतादेखील तितकीचं फिट आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now