Arshi Khan Tests Positive For COVID-19: बिग बॉस 14 ची स्पर्धक अर्शी खान हिला कोरोनाची लागण, सोशल मिडियाद्वारे दिली माहिती
' काल माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे, त्यांनी सुरक्षेचे सर्व प्रोटोकॉल फॉलो करावे. सुरक्षित राहा आणि प्रार्थना करा.' असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे
बॉलिवूडपासून टीव्ही मालिकांमधील अनेक कलाकारांना कोरोनाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. यात अनेक दिग्गज कलाकारांसह दिग्दर्शक, गायक, कोरिओग्राफर यांचा समावेश आहे. दरम्यान बिग बॉस 14 ची स्पर्धक अर्शी खान (Arshi Khan) हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तिने स्वत: सोशल मिडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी अर्शी खान पंजाबमध्ये शूटिंग पूर्ण करुन मुंबईत परतली होती. त्यानंतर तिच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यानंतर तिने आपली कोरोना चाचणी करून घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचे समजले आहे.
अर्शी खानने इन्स्टाग्रामवर माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. ' काल माझ्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली होती. जो कोणी माझ्या संपर्कात आला आहे, त्यांनी सुरक्षेचे सर्व प्रोटोकॉल फॉलो करावे. सुरक्षित राहा आणि प्रार्थना करा.' असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Renuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग
बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर म्हणून तिची एन्ट्री झाली होती. अर्शी या सिझनमध्ये आल्यानंतर तिने खूप चांगले प्रदर्शन केले होते. खूप चांगला गेम खेळली होती. मात्र ती टॉप 5 मध्ये जागा बनवू शकली नाही.
दरम्यान, याआधी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोना साथीच्या आजाराचा फटका बसला आहे. यात रणबीर कपूर, आमिर खान, आलिया भट्ट, संजय लीला भन्साळी, सोनू सूद, आशुतोष राणा, आर माधवन, मिलिंद सोमण अशी अनेक नावे आहेत. नुकतीच अर्जुन रामपाल आणि समीरा रेड्डी यांचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.