Armaan Jain ला Money Laundering Case प्रकरणी ईडी कडून पुन्हा समन्स; 17 फेब्रुवारीला हजर होण्याचे आदेश
अभिनेता रणबीर कपूर याचा चुलत भाऊ अरमान जैन ( Armaan Jain) याला कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडी कडून समन्स पाठवण्यात आला आहे.
अभिनेता रणबीर कपूर याचा चुलत भाऊ अरमान जैन ( Armaan Jain) याला कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडी कडून समन्स पाठवण्यात आला आहे. दरम्यान अरमान जैन याला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र तो न आल्याने पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आला आहे. आता उद्या (17 फेब्रुवारी) दिवशी अरमान जैन याला ईडी कार्यालयात (ED Office) हजर राहण्याचे आदेश आहेत. आता तो गैरहजर राहिल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती आहे. Money Laundering Case: टॉप्स सिक्युरिटी प्रकरणात ED कडून MMRDA आयुक्त R A Rajeev यांना समन्स.
अरमान जैन हा रीमा जैन यांचा मुलगा आहे. आणि टॉप्स ग्रुप संबंधित एका केस मध्ये त्यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणी मागील मंगळवारी ईडीच्या अधिकार्यांनी साऊथ मुंबई मधील त्याच्या घरी छापेमारी केली आहे. मात्र त्यावेळेस राजीव कपूर यांच्या निधनामुळे ही छापेमारी केवळ 2 तास चालली आणि नंतर कारवाई स्थगित करण्यात आली.
ANI Tweet
मीडीया रिपोर्ट्सनुसार, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांच्यासोबत असलेल्या संबंधांमुळे अरमान जैन याचे नाव या केस मध्ये जोडले गेले आहे. काही दिवसांपासून विहंग सरनाईक याची चौकशी आणि त्याच्या घरी, कार्यालयात छापेमारी करण्यात आली. त्यामध्ये चॅट्समधून समोर आलेल्या माहितीवरून अरमान जैन कडे आता संशयाची सुई आहे.
आज टॉप्स सिक्युरिटी कथित घोटाळा प्रकरणी एमएमआरडीचे आयुक्त आर ए राजीव यांना देखील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश आहेत. त्या आदेशानुसार आज राजीव मुंबई मध्ये ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत.