Arbaaz Khan घेतला कोरोनाचा पहिला डोस, चाहत्यांना दिला महत्त्वाचा संदेश
यात त्याने पांढ-या रंगाचे टीशर्ट घातले असून नारिंगी रंगाची ट्रॅक पँट घातली आहे.
कोरोना काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोना लसीकरण मोहिम युद्धपातळीवर सुरु आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाने घेरले असून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बॉलिवूड कलाकार कोरोनाची लस घेत आहेत. दरम्यान अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) याने देखील कोरोनाची पहिली लस (COVID Vaccination) घेतली असून यासंदर्भातील एक व्हिडिओ त्याने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. त्याने कोरोना व्हॅक्सिन घेतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अरबाज खान खूपच उत्साही दिसत आहे. यात त्याने पांढ-या रंगाचे टीशर्ट घातले असून नारिंगी रंगाची ट्रॅक पँट घातली आहे.हेदेखील वाचा- Anushka Sharma ने मानले कोविड-19 संकटात अहोरात्र काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्यसेवकांचे आभार (Watch Video)
कोरोनाचा पहिला डोस घेतल्यानंतर अरबाज खानने हा व्हिडिओ शेअर केला आहे. "माझी पूर्ण वाट लागली आहेत. तुम्ही पण लवकरात लवकर लस घ्या अन्यथा तुमचीही वाट लागेल." या व्हिडिओमध्ये अरबाज खान मस्ती करताना दिसत आहे.
अरबाजचा भाऊ सलमान खानने देखील कोरोनाची लस घेतली आहे. सलमानने कोरोनाच्या या लढाईत सहभागी होऊन गरजूंना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली आहे. त्याचप्रमाणे कोविड योद्धांना जेवण पोहोचवण्याचे काम देखील सलमान करत आहे.
दरम्यान गेल्या वर्षी प्रमाणेच सलमान खान याच्याकडून 25 हजार रुपये श्रमिकांना आर्थिक रुपात मदत करण्यासाठी पुढे येणार आहे. अभिनेत्याने कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आल्यामुळे त्याचा फटका बसलेल्या श्रमिकांच्या बँक खात्यात 1500 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे.
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडियन सिने एम्पॉइज (FWICI) चे महासचिव अशोक दुबे यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बातचीत केली. त्यावेळी दुबे यांनी असे म्हटले की, सलमान खान याच्या मॅनेजरने FWICI चे अध्यक्ष बीएन तिवारी यांच्यासोबत बोलणे केले आहे. आम्हाला फेडरेशन मधून 25 हजार श्रमिकांचे अकाउंट डिटेल्स पाठवण्यास सांगितले आहे. अभिनेता प्रत्येक श्रमिकाच्या खात्यात 1500 रुपये जमा करणार आहे. यापूर्वी सुद्धा सलमान खान याने गेल्या वर्षी ही कोविडमुळे फटका बसलेल्या श्रमिकांना मदत केली होती.