Virat Kohli Anushka Sharma Expecting Second Child: अनुष्का शर्मा-विराट कोहली दुसऱ्यांदा आई-बाबा होणार; एबी डिव्हिलियर्सने केला खुलासा

लवकरचं त्याचे दुसरे अपत्य येणार आहे. त्यामुळे तो कुटुंबासोबत आहे आणि ते महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःशी खरे आणि प्रामाणिक नसाल तर तुम्ही इथे कशासाठी आहात ते तुम्ही गमावून बसता. बहुतेक लोकांचे कुटुंब हे त्यांचे प्राधान्य असते. तुम्ही विराटला याचा न्याय देऊ शकत नाही. होय, आम्हाला त्याची आठवण येत आहे. पण, त्याने योग्य निर्णय घेतला आहे.

AB de Villiers, Anushka Sharma-Virat Kohli (PC -X, Instagram)

Virat Kohli Anushka Sharma Expecting Second Child: विराट कोहली (Virat Kohli) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत का नाही? त्याचा खास मित्र एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) ने याचा खुलासा केला आहे. एबी डिव्हिलियर्सने शनिवारी त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, कोहली सध्या त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सोबत वेळ घालवत आहे. लवकरच हे जोडपे दुसऱ्यांदा पालक होणार आहे. त्यामुळे कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटींमधून माघार घेतली.

एबी डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, 'मला एवढेच माहीत आहे की विराट कोहली बरा आहे. तो काही वेळ आपल्या कुटुंबासोबत घालवत आहे, त्यामुळेच त्याने पहिल्या 2 कसोटी सामन्यांमधून माघार घेतली आहे. एबी डिव्हिलियर्सने म्हटलं आहे की, त्याने अलीकडेच विराटची तब्येत जाणून घेण्यासाठी मेसेज केला होता. यानंतर कोहलीने आपण आपल्या कुटुंबासोबत असल्याचे सांगितले होते. विराट दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. या कारणास्तव तो कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. (हेही वाचा -Virat Kohli-Anushka Sharma Daughter Name: विरुष्काच्या मुलीचं नाव आलं समोर, अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबत शेअर केला लेकीचा गोंडस Photo)

डिव्हिलियर्सने पुढे म्हटलं आहे की, होय. लवकरचं त्याचे दुसरे अपत्य येणार आहे. त्यामुळे तो कुटुंबासोबत आहे आणि ते महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःशी खरे आणि प्रामाणिक नसाल तर तुम्ही इथे कशासाठी आहात ते तुम्ही गमावून बसता. बहुतेक लोकांचे कुटुंब हे त्यांचे प्राधान्य असते. तुम्ही विराटला याचा न्याय देऊ शकत नाही. होय, आम्हाला त्याची आठवण येत आहे. पण, त्याने योग्य निर्णय घेतला आहे. (वाचा - Virat Kohli आणि Anushka Sharma ने Dubai मध्ये साजरे केले नवीन वर्ष, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो)

तथापी, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा 2017 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. 2021 मध्ये ते पहिल्यांदा पालक झाले. अनुष्काने एका मुलीला जन्म दिला, तिचे नाव वमिका आहे. आता विराट दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती डिव्हिलियर्सकडून मिळाली आहे. मात्र, अद्याप यावर विराटकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif