Anushka Sharma Kisses Virat Kohli: विराट कोहली च्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने शेअर केले रोमांटिक Photos!

वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्का शर्मा आणि टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी एकत्रितपणे विराटचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला

Anushka Sharma & Virat Kohli (Photo Credits: Instagram)

क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) याने गुरुवारी (5 नोव्हेंबर) आपला 32 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) यांनी एकत्रितपणे विराटचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, अनुष्का शर्मा ने विराट कोहली सोबतचे रोमांटिक फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन कोहली; RCB व्यवस्थापन, अनुष्का शर्मासोबत विराटने बोटीवर केलं जंगी सेलिब्रेशन, पाहा Video)

अनुष्का शर्मा ने इंस्टाग्रामवर दोन फोटोज पोस्ट केले आहेत. यात दोघांचाही रोमांटिक अंदाज दिसून येत आहे. एका फोटोज दोघं एकमेकांना प्रेमाने अलिंगन दिले असून दुसऱ्या फोटोज अनुष्का विराटला किस करताना दिसत आहे. या फोटोवर चाहत्यांच्या जबरदस्त प्रतिक्रीया येत आहेत तर विरुष्काच्या रोमांटिक केमिट्रीची अनेकजण तारीफ करत आहेत.

पहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

आयपीएल 2020 सुरु असल्याने अनुष्का देखील विराट सोबत दुबईत आहे. अनेकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमला सपोर्ट करताना ती प्रसारमाध्यमांवर दिसते. अलिकडेच विराट कोहली ने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अनुष्काने त्याला फ्लाईंग किस देताना दिसली. ते फोटोजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (Anushka Sharma Baby Bump Pics: सूर्याच्या किरणांनी खुललं गरोदर अनुष्का शर्मा चे सौंदर्य, बेबी बंप दाखवत शेअर केला हा सुंदर फोटो)

झीरो सिनेमानंतर अनुष्काने ब्रेक घेतला असून ती प्रेग्नेंट आहे. लवकरच विरुष्काच्या घरी नव्या पाहुण्याचे आमगन होईल. काही महिन्यांपूर्वी ही गुडन्यूज दोघांहीनी सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली होती.



संबंधित बातम्या