Anushka Sharma ने मानले कोविड-19 संकटात अहोरात्र काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्यसेवकांचे आभार (Watch Video)
मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्स जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने पत्र लिहिले आहे.
सध्या देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) कहर सुरु आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही सर्व आरोग्यसेवक (Healthcare Workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्स (Frontline Workers) जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने एक खास नोट लिहिली आहे. याचा एक व्हिडिओ तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कोरोना रुग्ण, पोलिस, डॉक्टर्स, पोलिस दिसत आहेत. त्यानंतर एक छोटासा संदेश लिहिला आहे. त्यात ती म्हणते, "आमचे जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्यसेवकांना धन्यवाद. भारत देश तुमच्यासोबत आहे."
हा व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, "आम्ही आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्संना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांचे योगदान खरंच प्रेरणादायी आहे. देशासाठी तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालत आहात आणि त्यासाठी आम्ही तुमचे कायम कृतज्ञ असू. माझ्यासाठी, विराटसाठी आणि देशासाठी तुम्ही खरे हिरो आहात. पुन्हा एकदा धन्यवाद."
पहा व्हिडिओ:
दरम्यान, विराट आणि अनुष्काने कोविड-19 ग्रस्त लोकांच्या मदतीसाठी निधी गोळा करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्यांनी Ketto वर एक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होण्याचे त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे. या मोहिमेत त्यांनी स्वत: 2 कोटींची मदत केली आहे.