Anusha Dandekar ने अखेर Karan Kundra सोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांना दिला पूर्णविराम, पोस्ट शेअर करुन सांगितले नातं तुटण्याचे 'हे' कारण
अनुषाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन आपले आणि करणचे ब्रेकअप झाल्याची अधिकृतरित्या सांगितले. या संदर्भात तिने भली पोस्ट लिहिली असून ब्रेकअपमागचे कारण सांगितले आहे.
अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आणि करण कुंद्रा (Karan Kundra) यांचे 5 वर्षांचे नाते अखेर संपुष्टात (Break Up) आल्याचे अनुषा शर्मा हिने स्वत: च्या सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले होते. या दोघांनाही याबाबत मिडियाने विचारले असता असे काही झाले नसल्याचे ते सांगत होते. मात्र आज अखेर अनुषाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन आपले आणि करणचे ब्रेकअप झाल्याची अधिकृतरित्या सांगितले. या संदर्भात तिने भली पोस्ट लिहिली असून ब्रेकअपमागचे कारण सांगितले आहे.
ती म्हणते "हो मी 'लव स्कूल' नावाचा शो केला होता आणि हो मी तुमची लव्ह प्रोफेसर होती. हो मी जे काही शेअर केले, जे सल्ले दिले ते अगदी खरे आणि मनापासून दिलेले होते. मी खूप खोलवर जाऊन एखाद्यावर प्रेम करते जोपर्यंत त्या नात्यात भांडणासाठी काहीच उरत नाही. मी सुद्धा एक मनुष्य आहे. मी सुद्धा माझा आत्मसन्मान आणि स्वत:ला गमावले. हो मला धोका देण्यात आला आहे आणि खोटं बोलण्यात आले आहे. हो समोरून माझी माफी मागितली जाईल याची वाट पाहत होती, जी कधीच नाही आली."हेदेखील वाचा- Sonam Kapoor Passionate Kiss With Anand Ahuja: सोनम कपूर ने पती आहुजा सोबत किस करतानाचा फोटो शेअर करत दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा! (See Post)
अनुषा पुढे असेही म्हणाली की, "तुम्ही मला अगदी मोकळेपणाने प्रेम करताना पाहिले. आता मला स्वत:वर प्रेम करताना बघा. माझा एक शेवटचा सल्ला, प्रेम अनेक रुपात असते. मात्र त्याला एवढं डोईजड होऊ देऊ नका, ज्यामुळे तुम्ही स्वत:ला गमवाल."
थोडक्यात अनुषाला करण कडून खूप मोठा धोका मिळाल्याचे तिच्या या पोस्टमधून दिसत आहे. त्यामुळे त्यांचे नाते तुटले असून आता ती स्वत:वर मनसोक्त प्रेम करताना दिसणार आहे. सांगायचे झाले की, अनुषा आणि करण 5 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अनुषा आधी करण अभिनेत्री कृतिका कामरासोबत रिलेशनमध्ये होता.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)