Anup Jalota Receives BA Degree: तब्बल 47 वर्षांनंतर वयाच्या 67 व्या वर्षी भजन गायक अनूप जलोटा यांना मिळाली 'बीए'ची डिग्री (See Photo)
लखनौ विद्यापीठाकडून (Lucknow University) त्यांना ही डिग्री देण्यात आली आहे. 1974 साली अनूप जलोटा येथून पदवीधर झाले होते
भजन गायक, अभिनेता अनुप जलोटा (Anup Jalota) यांना 47 वर्षानंतर त्यांची बीएची डिग्री (BA Degree) मिळाली आहे. लखनौ विद्यापीठाकडून (Lucknow University) त्यांना ही डिग्री देण्यात आली आहे. 1974 साली अनूप जलोटा येथून पदवीधर झाले होते, मात्र त्यांना त्यावेळी डिग्री मिळू शकली नव्हती. अशा स्थितीत बुधवारी सकाळी कुलगुरू कार्यालयात कुलगुरूंनी त्यांना ही पदवी दिली. लखनौ विद्यापीठाची स्थापना होऊन 100 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यामुळे येथे 'शताब्दी उत्सव' कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी अनूप जलोटा यांना निमंत्रित करण्यात आले होते.
माध्यमांच्या वृत्तानुसार, 47 वर्षानंतर बीएची पदवी मिळवल्यानंतर अनूप जलोटा म्हणाले की, ‘मला असे वाटत आहे की मला दुसर्यांदा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.’ गायक अनूप जलोटा पुढे म्हणाले की, ‘लखनौ विद्यापीठाशी एक भावनिक नाते आहे जे शब्दांत व्यक्त करणे अवघड आहे. विद्यापीठाच्या शताब्दी मोहत्सवात कला सादर केल्याचा आनंद अतुलनीय आहे. जे सुख याच्यात आहे ते कशातही नाही.‘ आपल्याला डिग्री मिळाल्याबाबत जलोटा यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. (हेही वाचा: Knock-Knock गँगकडून मनस्वी वशिष्ठ चा मोबाईल फोन चोरीला; अभिनेत्याने शेअर केला अनुभव)
अनूप जलोटा लवकरच गायक बाप्पी लहिरी आणि रॅपर हनी सिंगशी स्पर्धा करताना दिसणार आहेत. अनूप जलोटा यांचे हे गाणे 'वो मेरी स्टूडेंट है' या आगामी चित्रपटातील आहे, ज्याचे शूटिंग जवळजवळ पूर्ण झाले आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्यांची विद्यार्थी म्हणून जसलीन मथारु दिसणार आहे. नुकतीच जसलीनने तिच्या इंस्टाग्रामवर अनूप जलोटासोबत शूटचे फोटोज शेअर केले आहेत, ज्यात दोघेही ग्लॅमरस आउटफिटमध्ये दिसत आहेत.