Allegations Against Sajid Khan: साजिद खानवर आणखी एका मॉडेलने लावले गंभीर आरोप; म्हणाली, '5 मिनिटे माझ्या प्रायव्हेट पार्टकडे पाहत राहिला'
सलोनी चोप्रा, शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी आणि कनिष्का सोनी यांच्यानंतर आता आणखी एक नाव मीडियात चर्चेत आलं आहे. या मॉडेलने साजिद खानच्या घाणेरड्या वागण्यावरून पडदा हटवला आहे.
Allegations Against Sajid Khan: चित्रपट निर्माता साजिद खान (Sajid Khan) च्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच्यावर अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. पीडितांची ही यादी कमी होण्याऐवजी वाढत आहे. सलोनी चोप्रा, शर्लिन चोप्रा, राणी चॅटर्जी आणि कनिष्का सोनी यांच्यानंतर आता आणखी एक नाव मीडियात चर्चेत आलं आहे. या मॉडेलने साजिद खानच्या घाणेरड्या वागण्यावरून पडदा हटवला आहे.
यापूर्वी, साजिद खानचे हिंसक आणि घाणेरडे वर्तन बिग बॉस या शोमध्ये पाहायला मिळाले होते. या शोमध्ये गौतम विजला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होता. साजिदचे हे वर्तन त्याच्या सर्व चाहत्यांसाठी धक्कादायक होते. पण, आता आणखी एका मॉडेलने साजिदवर घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. (हेही वाचा -Shah Rukh Khan वर कस्टम अधिकाऱ्यांची कारवाई; महागडी घड्याळे बाळगल्याप्रकरणी ठोठावला 6.83 लाखांचा दंड)
मॉडेल आणि अभिनेत्री शीला प्रिया सेठने एका मुलाखतीत सांगितले की, साजिदने तिच्यासोबत 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 मध्ये काय केले होते. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इतर दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केलेल्या शीला म्हणाल्या, “मी पहिल्यांदा दिग्दर्शक साजिदला 2008 मध्ये भेटले होते. जेव्हा मी त्याला त्याच्या आगामी चित्रपटात मला कास्ट करण्यास सांगितले तेव्हा त्याच्या काही कृत्यांमुळे मी थक्क झाले."
शीलाने सांगितले की, 'तो जवळपास पाच मिनिटे माझ्या प्रायव्हेट पार्टकडे पाहत राहिला आणि म्हणाला की, तुझी शस्त्रक्रिया करावी लागेल. कारण, तुझे स्तन बॉलिवूडसाठी पर्याप्त नाहीत.' त्यासाठी त्याने रोज काही तेलाने मसाज करायला हवा असेही सांगितले. तथापी, शर्लिन चोप्राने जेव्हापासून साजिद खानच्या वागणुकीबद्दल काही गोष्टी सांगितल्या तेव्हापासून साजिदचे प्रकरण वाढले आहे. 2005 मध्ये साजिदने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप शर्लिनने केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2022 09:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

