Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत नाही तर अंकिता लोखंडे स्वत: च भरते आपल्या घराचे EMI; सोशल मिडियावर शेअर केला खुलासा

हा पुरावा म्हणजे अंकिताच्या घराची कागदपत्रे, EMI आणि बँक अकाउंट्स डिटेल्स असलेल्या कागदपत्रांचा फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

Sushant Singh Rajput And Ankita Lokhande (Photo Credit: Twitter)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरण दिवसेंदिवस वेगवेगळी वळणे घेताना दिसत आहे. सुशांतच्या आर्थिक व्यवहारांबाबत तपास करणा-या एका अधिका-याने अलीकडे एक नवीन खुलासा केला आहे. ज्यात सुशांत आपल्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिच्या घराचा देखील EMI भरत होता. असे सांगितले आहे. ही बातमी सोशल मिडियावर वा-यासारखी पसरली. त्यानंतर अंकिता लोखंडे हिने या चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी यासंदर्भातील एक महत्त्वाचा पुरावा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा पुरावा म्हणजे अंकिताच्या घराची कागदपत्रे, EMI आणि बँक अकाउंट्स डिटेल्स असलेल्या कागदपत्रांचा फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे. #GlobalPrayers4SSR: सुशांतच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून 15 ऑगस्टला ग्लोबल प्रेअर्सचे आयोजन; अंकिता लोखंडे हिने पोस्ट शेअर करुन चाहत्यांना सहभागी होण्याचे केले आवाहन

 

View this post on Instagram

 

Here i cease all the speculations.As transparent as I could be.My Flat's Registration as well as my Bank Statement's(01/01/19 to 01/03/20)highlighting the emi's being deducted from my account on monthly basis.There is nothing more I have to say🙏 #justiceforssr

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

या फोटोंखाली "येथे मी पारदर्शकता दाखवून माझ्याबाबत सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देते. हे माझ्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन आणि माझे बँक स्टेटमेंट आहे, ज्यात प्रत्येक महिन्यात माझे घराचे EMI कट होत आहे. याबाबत मला आखी जास्त बोलायचे नाही." असे अंकिताने म्हटले आहे.

या फोटोवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने तिच्यावर विश्वास दाखवत सांगितले की, "तू एक स्वतंत्र महिला आहेस आणि मला तुझ्यावर गर्व आहे.!"

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now