CBI Inquiry for Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूत च्या निधनाला आज 2 महिने पूर्ण; अंकिता लोखंडे, वरुण धवन सह या सेलिब्रिटींनी केला #CBIForSSR कॅम्पेनला सपोर्ट
यासाठी सुरु केलेल्या #CBIForSSR कॅम्पेनला अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), कंगना रनौत (Kangana Ranaut), वरुण धवन, क्रिती सेनॉन यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.
बॉलिवूडचा हरहुन्नरी कलाकार सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आज 2 महिने पूर्ण झाले. वयाच्या 34 व्या अशा तरूण आणि हरहुन्नरी अभिनेत्याने आपल्यातून जाणे हे अनेकांना चटका लावणारे आहे. 14 जून 2020 रोजी वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडसह देश हळहळला. मात्र त्याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्यात यावा अशी मागणी त्याच्या कुटूंबियांसह त्याचे चाहते आणि बॉलिवूडमधील कलाकार करत आहेत. यासाठी सुरु केलेल्या #CBIForSSR कॅम्पेनला अंकिता लोखंडे (Ankita Lokhande), कंगना रनौत (Kangana Ranaut), वरुण धवन, क्रिती सेनॉन यांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे.
या प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपविण्यात यावी अशी मागणी या कलाकारांकडून केली जात आहे.
View this post on Instagram
#justiceforsushantsinghrajput. #CBIforSSR
A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on
आम्हाला या प्रकरणामागचे सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे असे कंगना रनौत हिने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. RIP Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येविषयी निर्माते मुकेश भट यांनी केले 'हे' धक्कादायक विधान
त्यासोबतच क्रिती सेनॉन, वरुण धवन यांनी देखील आपल्या इन्स्टाग्राम स्टेटसवरुन
#CBIForSSR कॅम्पेनला सपोर्ट केला आहे.
दरम्यान सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने सोशल मिडियावर CBI चौकशीची मागणी करत एक पोस्ट केली आहे. सुशांतच्या कुटूंबाने असा आरोप केला आहे की, सुशांतची आत्महत्या नसून तो खून असू शकतो. त्यामुळे ते सर्व CBI चौकशीची मागणी करत आहे.