Sushant Singh Rajput च्या जन्म दिवसानिमित्त Ankita Lokhande आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन करणार 'ही'खास गोष्ट, सुशांतच्या आठवणींना देणार उजाळा

आज सुशांतच्या जन्मदिवसानिमित्त एक खास गोष्ट करुन अंकिता त्याच्या आठवणींना उजाळा देणार आहे.

Ankita Lokhande, Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram/Facebook)

बॉलिवूड मधील एक लखलखता तारा सुशांत सिंह राजपूत याची आज बर्थ अॅनिव्हर्सरी (Sushant Singh Rajput Birth Anniversary)... 14 जून 2020 ला सुशांतने त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या आणि लखलखता तारा अचानक आपल्यातून नाहीसा झाला. त्याने अशी अचानक झालेली एक्झिट त्याच्या कुटूंबियांसह त्याच्या चाहत्यांना पचवणे आजही जड जात आहे. अनेकांना तर अजून तो आपल्यासोबतच आहे असेच वाटते. त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिची देखील हिच भावना आहे. म्हणून आज सुशांतच्या जन्मदिवसानिमित्त एक खास गोष्ट करुन अंकिता त्याच्या आठवणींना उजाळा देणार आहे.

अंकिता लोखंडे हिने सुशांतचा एक जुना व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करुन "मी आज सुशांतचे असे काही निवडक व्हिडिओ शेअर करणार आहे ज्यामुळे त्याच्या आठवणींना उजाळा देता येईल' असे या व्हिडिओखाली लिहिले आहे. तिने तिच्या कुत्र्यासोबतचा सुशांतचा एक क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.हेदेखील वाचा- Sushant Singh Rajput Birth Anniversary: पवित्रा रिश्ता ते एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा या 5 कलाकृतींमधील सुशांत सिंह राजपूत च्या भूमिका आजही रसिकांच्या मनावर करतात राज्य!

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

'मला आज कुठून सुरुवात करावी हेच कळत नव्हते. म्हणून मी आज सुशांतचे जुने व्हिडिओज शेअर करणार आहे. सुशांत हे व्हिडिओज तुझ्या आठवणींस्वरूप माझ्याकडे आहे ज्या मी कधीच विसरू शकणार नाही. स्कॉच (कुत्र्याचे नाव) हा देखील तुला प्रचंडज मिस करतोय. मी प्रार्थना करते तू जिथे असशील तिथे खूश असशील. वाढदिवसाच्या शुभेच्छा' असे पोस्ट अंकिताने केले आहे.

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून सुशांतच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला साधा, भोळा मानव आजही लोकांच्या मनात घर करून आहे. त्यानंतर काय पो चे मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन सुशांतने केदारनाथ, एम.एस.धोनी- अनटोल्ड स्टोरी, राबता, शुद्ध देसी, रोमांन्स, पीके, छिछोरे यांसारख्या अनेक चित्रपटांमधून स्वत:चे अभिनय कौशल्य दाखवून सिद्ध केले. 'दिल बेचारा' हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.