Khaali Peeli Poster & Release Date: अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'खाली पीली' चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख आली समोर

त्यामुले अनन्याने हे पोस्ट शेअर करुन त्याखाली 'या मॅड राइडमधून प्रवास करायचा असेल तर तयार रहा 2 ऑक्टोबरला. येत आहे खाली पीली.' असे लिहिले आहे.

Khaali Peeli Poster (Photo Credits: Instagram)

अनन्या पांडे (Ananya Pandey) आणि ईशान खट्टर (Ishaan Khattar) यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'खाली पीली' (Khaali Peeli) या चित्रपटाचे नवीन पोस्टर समोर आले आहे. या पोस्टरला चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये अनन्या टॅक्सीवर आपल्या हॉट अंदाजात बसलेली दिसत आहे तर ईशान खट्टर ड्रायव्हर सीटवर बसलेला दिसत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. तसेच या चित्रपटातून अनन्या आणि ईशान ही जोडी प्रथमच एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. अभिनेत्री अनन्या पांडे देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे पोस्टर शेअर केले आहे.

या चित्रपटाची टॅगलाईन आहे 'एक लड़का एक लड़की और एक मॅड राइड'. त्यामुले अनन्याने हे पोस्ट शेअर करुन त्याखाली 'या मॅड राइडमधून प्रवास करायचा असेल तर तयार रहा 2 ऑक्टोबरला. येत आहे खाली पीली.' असे लिहिले आहे. Khaali Peeli Teaser: अनन्या पांडे, ईशान खट्टर च्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित! (Watch Video)

 

View this post on Instagram

 

Mad ride ki sawari karni hai, toh ready rehneka 2nd October ko! 🤩 Aareli hai #KhaaliPeeli, exclusively on @zeeplexofficial 🚕💥 @ishaankhatter @jaideepahlawat @macriaan @ihimanshumehra @aliabbaszafar @zeestudiosofficial @offsideent @zeemusiccompany

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday) on

हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असून हा जीप्लेक्सवर रिलीज केला जाईल असे सांगण्यात येत आहे. हा एक असा चित्रपट आहे ज्याला पाहण्यासाठी प्रत्येक वेळेस प्रेक्षकांना पैसे मोजावे लागतील. याचाच अर्थ यात वन टाईम चार्ज नसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. यात जयदीप अहलावत आणि सतीश कौशिक मुख्य भूमिकेत असतील.