Anant-Radhika Wedding Return Gift: अनंत अंबानींनी मित्रांना दिले करोडो रुपयांचे रिटर्न गिफ्ट; किंमत ऐकून सरकेल पायाखालची जमीन
अनंतने लग्नात सर्व पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट्स दिले. पण खास पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून करोडोंची घड्याळं देण्यात आली. यामध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, वीर पहाडिया, सलमान खान, मीझान जाफरी, शिकार पहाडिया यांच्यासह 25 जवळच्या मित्रांचा समावेश होता.
Anant-Radhika Wedding Return Gift: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याने उद्योगपती वीरेन ए मर्चंटची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) सोबत 12 जुलै रोजी विवाह केला. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर (Jio World Convention Center) मध्ये हा लग्नसोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय व्हीव्हीआयपी पाहुण्यांचा समावेश असलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चून पार पडलेल्या या शाही विवाहाची केवळ देशातच नाही तर परदेशातही चर्चा होत आहे.
अनंत अंबानी यांनी त्यांच्या 25 खास मित्रांना सुमारे 2 कोटी रुपयांची लक्झरी घड्याळे भेट दिली आहेत. एका पोस्टद्वारे याचा खुलासा झाला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की अनंतने ऑडेमार्स पिगेट ब्रँडच्या रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर प्रीमियर वॉचच्या 25 मर्यादित आवृत्त्या रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्या मित्रांना दिल्या आहेत. अनंतने लग्नात सर्व पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट्स दिले असले तरी त्याने त्याच्या खास मित्रांना खास भेटवस्तू दिल्या. (हेही वाचा - Anant – Radhika Wedding: पंतप्रधान नरेंद्र मोदींची अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हजेरी; मुकेश अंबानींकडून स्वागत)
खास पाहुण्याला खास रिटर्न गिफ्ट -
अनंतच्या लग्नाच्या मिरवणुकीत शाहरुख खानपासून हार्दिक पांड्या आणि रणवीर सिंगपर्यंतच्या वराच्या पथकाने प्रचंड डान्स केला. अनंतने लग्नात सर्व पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट्स दिले. पण खास पाहुण्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून करोडोंची घड्याळं देण्यात आली. यामध्ये शाहरुख खान, रणवीर सिंग, वीर पहाडिया, सलमान खान, मीझान जाफरी, शिकार पहाडिया यांच्यासह 25 जवळच्या मित्रांचा समावेश होता.
पहा व्हिडिओ -
या लक्झरी घड्याळाचे नाव रॉयल ओक पर्पेच्युअल कॅलेंडर प्रीमियर वॉच ऑफ ऑडेमार्स पिगेट ब्रँड आहे. हे घड्याळ 41 मिमी 18 कॅरेट सोने आणि गडद निळ्या रंगाच्या सब-डायल सॅफायर क्रिस्टलने बनवले आहे, ज्याची किंमत 2 लाख डॉलर म्हणजेच 1.67 कोटी रुपये आहे. वराच्या मित्रांनी हे घड्याळ घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - Hardik Pandya-Ananya Panday Dance Video: अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नात हार्दिक पंड्यासोबत थिरकली अनन्या पांडे, पाहा व्हिडिओ)
या घड्याळात गुलाबी सोनेरी टोनचे अंतर्गत बेझल आणि मॅन्युफॅक्चर कॅलिबर 5134 सेल्फ-वाइंडिंग मूव्हमेंट आहे. या घड्याळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आठवड्याचा दिवस, तारीख, महिना, खगोलीय चंद्र, लीप वर्ष, तास आणि मिनिटे दर्शविणारे कॅलेंडर आहे. हे घड्याळ एकूण 40 तासांचे पॉवर रिझर्व्ह देते. याव्यतिरिक्त, घड्याळात निळा पट्टा, 18K गुलाबी सोन्याचे ब्रेसलेट आणि AP फोल्डिंग बकल देखील आहे.