अभिनेत्री Amy Jackson ने दिला एका गोंडस मुलाला जन्म, सोशल मिडियावर शेअर केला चिमुकल्याचा पहिला फोटो

खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सह 'सिंग इज ब्लिंग' (Singh is Bling) या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson) हिने गोंडस मुलाला जन्म दिला.

Amy Jackson (Photo Credits: Instagram)

खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सह 'सिंग इज ब्लिंग' (Singh is Bling) या चित्रपटात काम केलेली अभिनेत्री अॅमी जॅक्सन (Amy Jackson) हिने गोंडस मुलाला जन्म दिला. तिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन बाळाचा पहिला फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली. हा फोटो शेअर करत तिनं 'Hi World!' असं लिहिलं असून आपल्या चिमुकल्याचा सुंदर फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडियावर पोस्ट करताच तिच्या मित्रपरिवारासह तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे.

हा क्षण अ‍ॅमीसाठी खूप खास आहे. सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. बाळाच्या जन्माचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

Amy Jackson चे ट्विट: 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 

 

Our Angel, welcome to the world Andreas 💙

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

Amy Jackson Baby (Photo Credits: Instagram)

अॅमी जॅक्सन सध्या सोशल मिडियावर बरीच सक्रीय असते. अलीकडेच तिने आपले बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. तिच्या बेबी बंप दिसण्यापासून ते बेबी शॉवरचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत होते. अ‍ॅमी आणि जॉर्ज यांचं हे पहिलं बाळ आहे. हे दोघंही 2015 पासून एकमेकांना डेट करत असून त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. हेही वाचा- अभिनेत्री Bruna Abdullah हिने शेअर केला Water Delivery चा अनुभव; इंस्टाग्रामवर पोस्ट केला मुलीसोबत खास फोटो

अॅमी जॅक्सनच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीबाबत बोलायचे झाले तर, गरोदर राहण्याआधी ती रजनीकांतच्या 2.0 या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यानंतर तिने गरोदरपणात पुर्णपणे ब्रेक घेतला होता. 'एक दीवाना था' या सिनेमातून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं होतं.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif