Amitabh Bachchan Accident on KBC: केबीसीच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापल्याने जखमेवर घालण्यात आले टाके

त्याच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Amitabh Bachchan (PC- PTI)

Amitabh Bachchan Accident on KBC: बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये खुलासा केला आहे की, त्यांना अलीकडेच KBC या रिअॅलिटी शोच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली होती. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, लोकप्रिय गेम शोच्या शूटिंगदरम्यान अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या पायाची नस कापली गेली. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितले की, त्यांच्या जखमेवर काही टाके घालण्यात आले जेणेकरून रक्तस्त्राव थांबवता येईल. ते आता पूर्णपणे बरे आहेत आणि काळजी करण्यासारखे काही नाही. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांना ही दुखापत कशी झाली? यासंदर्भातही सांगितलं आहे. (हेही वाचा - Malaika Arora Birthday: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने मिरर सेल्फी शेअर करत दिल्या खास शुभेच्छा; म्हणाला, तू फक्त माझीच राहा)

अमिताभ बच्चन यांना दुखापत कशी झाली?

बिग बींनी ब्लॉगमध्ये आपल्याला ही दुखापती कशी झाली यासंदर्भात सांगितले आहे की, सेटवरून बाहेर पडलेला धातूचा तुकडा त्यांच्या पायाला घासला गेला आणि त्यामुळे त्यांच्या पायाची नस कापली गेली. छोट्या ऑपरेशननंतर त्यांना टाके घालण्यात आले, त्यानंतर रक्तस्त्राव थांबला.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये असेही सांगितले आहे की, ते केबीसीच्या सेटवर जेवढा वेळ घालवतात, त्यादरम्यान त्यांची विशेष काळजी घेतली जाते. अमिताभ बच्चन नुकतेच 80 वर्षांचे झाले आहेत आणि या खास प्रसंगी केबीसीच्या टीमने एका खास एपिसोडचे आयोजन केले होते. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन यांचाही सहभाग होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif