Amitabh Bachchan, Twinkle Khanna आणि Shweta बच्चन यांचा एकत्र फोटो, अनेकांना आठवले बालपण (See Pic)
अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडीयावर फोटो शेअर करत आठवणी सांगितल्या आहे,
Amitabh Bachchan latest post : वेगवेगळे फोटो किंवा ट्विट शेअर करत सोशल मीडीयावर अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नेहमीच सक्रिय असतात, नुकतेच त्यांनी इंस्टाग्रामच्या पेजवर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे, सोशल मीडियीवर ह्या फोटोची चर्चा देखील होत आहे, खुप दिवसांपुर्वींचा हा फोटो आहे, आपल्या आठवणी ताजा करण्यासाठी हा फोटो शेअर केला आहे. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा ( Shweta Nanda) आणि टिंकल खन्ना (Twinkle Khanna) यांचा लहानपणीचा फोटो आहे.
हा फोटो श्वेताच्या वाढदिवसा निमित्त काढलेला आहे. ह्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांची मुलगी श्वेता नंदा आणि अभिनेत्री ट्विकंल खन्ना आहे. पांढऱ्या ड्रेस मध्ये टिंकल खन्ना आणि दुसऱ्या बाजूला श्वेता असल्याचे अमिताभ बच्चन यांनी सांगितले, श्वेताने निखिल नंदा ह्यांच्या सोबत लग्न केले. श्वेता आता अगत्स आणि नव्याची आई आहे. जी चित्रपटात पहिल्यादा चित्रपटात पाऊल टाकणार आहे आणि टिंकल खन्ना हीने अभिनेता अक्षय कुमार सोबत लग्न केले, असे ह्या फोटोच्या कॅप्शन मधून अमिताभ बच्चन यांनी आठवणी सांगतल्या आहे.
सोशल मीडियावर ह्या फोटोसंदर्भात चर्चा देखील चालू आहे, सोशल मीडीया युजर्स ह्या फोटोला कंमेट करत आहे, ह्या फोटोला सोशल मीडियावर युजर्स पंसती देत असल्याचे दिसून येत आहे,