Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप; एका महिलेच्या फेसबूक पोस्टनंतर चर्चांना उधाण
सोशल मीडियावर ते फक्त पोस्टच लिहितच नाही, तर चाहत्यांच्या प्रश्नांना तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तरंसुद्धा देत असतात.
बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते फक्त पोस्टच लिहितच नाही, तर चाहत्यांच्या प्रश्नांना तितक्याच मजेशीर पद्धतीने उत्तरंसुद्धा देत असतात. तसेच ऑनलाईन ब्लॉग्ज, फोटो, व्हिडीओज, सुविचार, कविताच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. मात्र, एका महिलेने फेसबूक एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक कविता पोस्ट केली आहे. ही कविता आपली असून बिग बींनी शेअर करताना त्याचे क्रेडिट किंवा श्रेयदेखील दिले नाही, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.
टीशा अग्रवाल असे त्या महिलेचे नाव आहे. टीशा या कवियित्री आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलेली कविता त्यांनी 24 एप्रिल 2020 मध्ये लिहून फेसबुकवर पोस्ट केली होती. हीच कविता अमिताभ बच्चन यांनी गुरुवारी (24 डिसेंबर) आपल्या ट्विटरच्या अकांऊटवरून शेअर केली आहे. हे लक्षात येताच टीशा अग्रवाल यांनी जेव्हा अमिताभ बच्चन तुमची पोस्ट कॉपी करतात आणि त्याचे क्रेडिटही देत नाहीत..अशावेळी आनंद व्यक्त करायचा की दु:ख.., अशा आशयाची त्यांनी पोस्ट केली आहे. हे देखील वाचा- Welcome 2021: आलिया भट्ट-रणबीर कपूर समवेत बॉलिवूडमधील 'हे' कपल्स 2021 मध्ये होऊ शकतात विवाहबद्ध!
टीशा अग्रवाल यांची पोस्ट-
टीशा यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. मात्र, टीशाच्या पोस्टनंतर अमिताभ बच्चन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच अमिताभ बच्चन यावर काय स्पष्टीकरण देतात? याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.