बिग बी अमिताभ बच्चन यांच्या Blog ला आज 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या माध्यमातून आपल्या 'Funny Emoji' मधून व्यक्त केला आपला आनंद
अमिताभ बच्चन यांनी 17 एप्रिल 2008 मध्ये आपला पहिला ब्लॉग लिहिला होता. तेव्हापासून ते आतापर्यत एकही दिवस न चुकता 4424 दिवस त्यांनी हा ब्लॉग लिहिल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
जगभरातील असंख्य लोक ज्यांना आपला आदर्श मानतात असे बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी आजचा दिवस फार खास आहे. त्याचे कारण म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ब्लॉगला आज 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या संदर्भात त्यांना आपले इमोजीस बनवून हा आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अनेक लोक त्यांचा ब्लॉगही पसंत करतात. त्यांचा ब्लॉग हा त्यांच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीचा विषय असतो.
अमिताभ बच्चन यांनी 17 एप्रिल 2008 मध्ये आपला पहिला ब्लॉग लिहिला होता. तेव्हापासून ते आतापर्यत एकही दिवस न चुकता 4424 दिवस त्यांनी हा ब्लॉग लिहिल्याचे त्यांनी या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
हा आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपले एक हसतानाचे इमोजी पोस्ट केले आहे. तसेच कोरोना व्हायरशी लढण्यासाठी आणि लॉकडाऊनध्ये लोकांच्या चेह-यावर थोडे हसू आणण्यासाठी त्यांनी आपले भन्नाट इमोजी पोस्ट केले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन COVID-19 मुळे देशात निर्माण झालेल्या स्थितीमुळे गरजूंना रोज दान करत 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट
तर दुसरीकडे रोजंदारीवर घर चालविणा-या लोकांवर आज लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली आहे. यांच्यासाठी स्वत: बिग बी अमिताभ बच्चन रोज 2000 खाद्यपदार्थांचे पॅकेट्स दान करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2020 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

