Amitabh Bachchan Voice Caller Tune: कॉलर ट्यूनवर आता ऐकू येणार नाही अमिताभ बच्चन यांचा आवाज; काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या
सायबर फसवणुकीमुळे लोकांना सावध करण्यासाठी ही कॉलर ट्यून बणवण्यात आली होती. मात्र, आता आजपासून तुम्हाला हा आवाज ऐकू येणार नाही, म्हणजेच आजपासून सायबर फसवणुकीची ही कॉलर ट्यून काढून टाकण्यात आली आहे.
Amitabh Bachchan Voice Caller Tune: आपण एखाद्याला फोन करतो तेव्हा आपल्याला कॉलर ट्यून (Caller Tune) वर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाज ऐकू येतो. सायबर फसवणुकीमुळे लोकांना सावध करण्यासाठी ही कॉलर ट्यून बणवण्यात आली होती. मात्र, आता आजपासून तुम्हाला हा आवाज ऐकू येणार नाही, म्हणजेच आजपासून सायबर फसवणुकीची ही कॉलर ट्यून काढून टाकण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची ही कॉलर ट्यून भारत सरकारने देशातील नागरिकांना सावध करण्यासाठी बनवली होती.
कॉलर ट्यूनवरून अमिताभ बच्चन ट्रोल -
गेल्या काही दिवसांपासून लोक या कॉलर ट्यूनमुळे खूप नाराज होत होते. खरं तर ही कॉलर ट्यून लोकांना सावध करण्यासाठी बसवण्यात आली होती. तथापी, गेल्या काही दिवसांत लोकांनी सोशल मीडियावर त्यावर नाराजी व्यक्त केली. यासोबतच, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आवाजामुळेही ट्रोल करण्यात आले. (हेही वाचा - Diljit Dosanjh Removed From Border 2: बॉर्डर 2 मधून दिलजीत दोसांझला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता; पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत काम केल्याने मोजावी लागली मोठी किंमत)
अमिताभ बच्चन यांचे ट्रोलर्सना उत्तर -
दरम्यान, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या एखा पोस्टवर नेटीझन्सनी त्यांच्या कॉलर ट्यूनच्या आवाजामुळे ट्रोल केले. याला उत्तर देताना, अमिताभ बच्चन म्हणाले की, 'हो सर, मी देखील एक चाहता आहे. तर??' वापरकर्त्याने उत्तर दिले की, 'मग फोनवर बोलणे बंद करा.' यावर उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, 'सरकारच्या भावाला सांगा, त्यांनी आम्हाला जे करायला सांगितले ते केले.' तथापी, आता सरकारनेचं ही कॉलर ट्यून बंद केली आहे. (हेही वाचा - Drug Case: ड्रग्ज प्रकरणात दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अटकला अटक; 7 जुलैपर्यंत सुनावण्यात आली न्यायालयीन कोठडी)
का बंद करण्यात आली कॉलर ट्यून?
खरं तर कॉलर ट्यून बंद करण्यामागे ट्रोलर्सचा काहीही संबंध नाही. जागरूकता मोहीम बंद झाल्यामुळे सरकारने कॉलर ट्यून बंद करण्याचा हा निर्णय घेतला आहे. आता सायबर फसवणुकीबद्दल लोकांना जागरूक करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय, या कॉलर ट्यूनमुळे लोकांना आपत्कालीन परिस्थितीत कॉल करताना मोठी गैरसोयी होत होती. त्यामुळे देखील सरकारने कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

