अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो' या चित्रपटातील हा लूक बघून तुम्हीही व्हाल अचंबित

या चित्रपटातील त्यांच्या हटके लूक मुळे सध्या ते चर्चेत आहे.

amitabh bachchan new look (Photo Credits: Twitter)

बॉलिवूडचा महानायक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यांचा या रुपेरी पडद्यावर दांडगा अनुभव, दमदार व्यक्तिमत्व यांमधून त्यांना महानायक का म्हटले जाते याची प्रचिती येते. नेहमीच आपल्या चाहत्यांना काही तरी नवीन द्यावे या दृष्टीन बिग बी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारतात. आणि त्या यशस्वीरित्या पेलतातही. सध्या ते सोशल मिडियावर चर्चेत आलेत ते त्यांच्या आगामी चित्रपटातील नवीन हटके लूकमुळे.

सध्या अमिताभ बच्चन लखनऊ येथे आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो' (Gulabo Sitabo) चे चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार (Shoojit Sircar) करत आहेत. चित्रीकरण सुरू होण्याआधी अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत चित्रिकरणाआधी मी असा आत गेलो होतो, मात्र, चित्रिकरणासाठी तयार झालो तेव्हा असा झाला. नेमक काय झाले हे सांगणार नाही.' असे चाहत्यांना सांगितले.

मात्र बिग बीं च्या डायहार्ट चाहत्यांनी त्या गोष्टीचा मागमूस घेऊन अखेर ते काय आहे या गोष्टीचा शोध घेतलाच. तर ते आहे गुलाबो सिताबो मधील बिग बीं चा आतापर्यंत कधी पाहायला मिळाला नाही असा लूक. हा लोक सोशल मिडियावर वायरल होत आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या बाबती संबंधीचा फोटो ट्विट केला. त्यात त्यांनी या चित्रपटात बिग बीं सोबत अभिनेता आयुषमान खुराना (Ayushmann Khurrana) दिसणार आहे.

या लूकमध्ये अमिताभ यांची मोठी दाढी आणि मोठ्या चष्म्यासह एक वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. या त्यांच्या हटके लूक मुळे त्यांची या चित्रपटात नेमकी काय भूमिका असेल याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट 24 एप्रिल 2020 ला प्रदर्शित होईल.

हेही वाचा- 'अमिताभ बच्चन' यांनी वन टेक मध्ये पूर्ण केला 14 मिनिटांचा सीन, 'चेहरे' सिनेमाच्या टीम ने टाळ्या वाजवत केलं कौतुक

याआधी अमिताभ यांना 'पा', पिकू, ठग्स ऑफ हिंदुस्तान, शमिताभ, सरकार या चित्रपटांतून नानाविध अवतारात दिसले होते.



संबंधित बातम्या