Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राण प्रतिष्ठासाठी अमिताभ बच्चन, कतरिना-विकी कौशल रवाना; आलिया-रणबीरच्या लूकने वेधले लक्ष, Watch Video
अमिताभ बच्चन यांच्यानंतर अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विकी कौशल आणि कतरिना कैफही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी दोन्ही स्टार्स सोमवारी मुंबईहून रवाना झाले आहेत. यावेळी कतरिना गोल्डन सिल्क साडीत आणि विकी व्हाइट कलरच्या कुर्ता पायजमामध्ये दिसला.
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील श्री राम मंदिराची (Ram Mandir) सध्या सर्वत्र चर्चा आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर 22 जानेवारीला राम लला (Ram Lala) यांचा अभिषेक सोहळा होणार आहे. या विशेष प्रसंगी राजकारण, उद्योग आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी साक्षीदार होणार आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यातील काही अयोध्येला पोहोचले आहेत तर काही पोहोचणार आहेत. दरम्यान, मेगास्टार अमिताभ बच्चनही (Amitabh Bachchan) या कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत.
हे कलाकार अयोध्येला पोहोचले
कंगना राणौत, अनुपम खेर, जॅकी श्रॉफ, रामायण फेम अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लाहिरी आधीच अयोध्येत पोहोचले आहेत. यानंतर अमिताभ बच्चन सोमवारी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून अयोध्येला रवाना झाले आहेत. (हेही वाचा - Kangana Ranaut Offers Prayers Video: प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात केली पूजा)
वृत्तसंस्था एएनआयने बिग बींचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या कारमधून उतरताना दिसत आहेत.
पहा व्हिडिओ -
कतरिना-विकी
अमिताभ बच्चन यांच्यानंतर अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात विकी कौशल आणि कतरिना कैफही सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी दोन्ही स्टार्स सोमवारी मुंबईहून रवाना झाले आहेत. यावेळी कतरिना गोल्डन सिल्क साडीत आणि विकी व्हाइट कलरच्या कुर्ता पायजमामध्ये दिसला. (वाचा - Ayodhya Ram Mandir Inauguration Ceremony Live Streaming: अयोद्धेच्या श्रीराम मंदिरातील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video))
आलिया-रणबीर
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे देखील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी रवाना झाले आहेत. या कार्यक्रमात दोघेही वेगवेगळ्या लूकमध्ये दिसले. अभिनेता पांढरा धोती-कुर्ता तर अभिनेत्री निळ्या रंगाच्या साडी आणि शालमध्ये दिसली. त्यांच्यासोबत चित्रपट निर्माता रोहित शेट्टी देखील अयोध्येसाठी रवाना झाले आहेत.
कैलाश खेर अयोध्येला पोहोचले
बॉलीवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येत पोहोचले आहेत.
तथापी, सोमवारी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हिंदी आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्यानंतर यामध्ये रजनीकांत, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, अनुष्का शर्मा, ऋषभ शेट्टी आणि सुभाष घई यांच्यासह अनेक स्टार्सचा समावेश आहे. याशिवाय क्रिकेट सुपरस्टार विराट कोहलीही पत्नीसोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)