KBC च्या सेटवर अमिताभ बच्चन यांना चाहत्याकडून मिळाली अनपेक्षित भेट, पाहून बिग बी ही झाले भावूक
अगदी एखाद्या चित्रासारखी ती दिसत आहे. 7 नोव्हेंबरला त्याने हे गिफ्ट बिग बींना दिले आहे. ही रांगोळी पाहून बिग बींना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची ख्याती संपूर्ण जगभरात आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांचे चाहते (Fans) त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असतात. कुणी त्यांच्या दीर्घायुष्याची पूजा-अर्चा करतात, कुणी उपवास करतात. बिग बीं साठी पुष्पगुच्छ, फोटो, चित्र, स्केच यांसारखे अनेक भेटवस्तू देखील त्यांना दर दिवसा मिळत असतात. असेच काहीसे केले आहे त्यांच्या एका चाहत्याने. ते ही KBC च्या सेटवर. या चाहत्याने कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर बिग बींची सुंदर रांगोळी काढली. हे पाहून बिग बी देखील थक्क झाले.
ही रांगोळी पाहून कुणालाच विश्वास बसणार नाही की ही एक रांगोळी आहे. अगदी एखाद्या चित्रासारखी ती दिसत आहे. 7 नोव्हेंबरला त्याने हे गिफ्ट बिग बींना दिले आहे. ही रांगोळी पाहून बिग बींना स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. हेदेखील वाचा- Amitabh Bachchan To Be Alexa's Voice: अमिताभ बच्चन यांच्या आवाजात आता तुमच्याशी बोलणार एलेक्सा, 'हे' असेल या डिवाईसचे नाव
अमिताभने हा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. 'ही पेटिंग नसून ही रांगोळी आहे आणि ज्यांनी ही बनवली आहे त्यांनी माझा 51 वर्षाचा फिल्म इंडस्ट्रीचतला प्रवास दाखवला आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. 7 नोव्हेंबरला हे भेट देण्यामागे मुख्य कारण म्हणजे 7 नोव्हेंबर 1969 मध्ये बिग बींचा पहिला चित्रपट 'सात हिंदुस्तानी' प्रदर्शित झाला होता.
ही सुंदर भेट पाहून बिग बी ही कृतकृत्य झाले आहे. अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सध्या बिग बी KBC 12 च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यानंतर ते झुंड, चेहरे आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसतील.