कोरोना व्हायरसचं संकट थोपवण्यासाठी अमिताभ बच्चन यांचं पुन्हा खास आवाहन; बीग बींची ही पोस्ट जिंकतेय नेटकर्यांचं मन!
आता भारतासह जगभरात कोरोना संकट गंभीर स्वरूप घेत असताना त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी पुन्हा एका हटके अंदाजात आवाहन केलं आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पुन्हा आपल्या खास अंदाजामध्ये भारतीयांना कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. बीग बी अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच अॅक्टीव्ह असतात. त्यांच्या चाहत्यांसोबत ते ट्विटर, इंस्टाग्रामच्या माध्यमातून संपर्कामध्ये असतात. आता भारतासह जगभरात कोरोना संकट गंभीर स्वरूप घेत असताना त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी पुन्हा एका हटके अंदाजात आवाहन केलं आहे. " ख़बरदार !!! घर में रहो , बाहर ना निकलो ! इस कमबख़्त 'कोरोना' , को उलटा मत पड़ने दीजिए !! नहीं नहीं ... आप मेरी बात नहीं समझ रहे हैं ! 'कोरोना' को उलटा पढ़िए ... हो जाएगा ... 'नारोको" असं ट्वीट करत त्यांनी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. Coronavirus Tips Google Doodle: कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी 'घरी रहा सुरक्षित रहा' आवाहन करणारं खास गूगल डूडल.
करोना या शब्द उलता वाचला तर तो 'नारोको' असा होतो. त्यामुळे मनुष्याच्या जीववर उठलेल्या या व्हायरसला 'रोखू नको' असं म्हणायला वाव देऊ नका. असं आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांचं आवाहन
अमिताभ बच्चन यांचं ट्वीट
अमिताभ बच्चन यांनी ट्वीटरवर अजून एक ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या खांद्यावर जगाचा भार उचलला आहे. सध्या कोरोनाशी पुकारलेल्या या युद्धामध्ये आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी सर्वात आघाडीवर राहून संघर्ष करत आहेत. त्यामुळे बिग बींचं हे ट्वीट बोलकं आहे.
भारतामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 2000 च्या पार गेला आहे तर मृतांचा आकडा हा 53 आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे महाराष्ट्र राज्यात आहे. राज्यात हा आकडा 400 च्या पार गेला आहे. त्यामुळे आता नागरिकांना सावध राहून कोरोना संसर्गाची साखळी तोडावी लागणार आहे.