अमिताभ बच्चननी मराठीतून दिल्या चाहत्यांना विजयादशमीच्या शुभेच्छा !
ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चननी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज महाराष्ट्रभरामध्ये दसर्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून पोलिसांपर्यंत आणि अगदी सेलिब्रिटींनीही विविध स्वरूपात विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांना मराठीमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अमिताभ बच्चनच्या शुभेच्छा
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा!!
असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सध्या अमिताभ बच्चन नागराज मंजुळेच्या सिनेमामध्ये काम करत आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून आमिर खान आणि अमिताभ पहिल्यांदा रसिकांना एकत्र पहायला मिळणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mithun Chakraborty Gets BMC Notice: मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या! मालाडमधील बेकायदेशीर बांधकामाप्रकरणी BMC कडून कारणे दाखवा नोटीस
Advertisement
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement