Alia Bhatt हिचा कोरोना रिपोर्ट्स निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा शुटिंगला सुरुवात
परंतु त्याला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती.
बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूर याच्यासोबत ती आगामी चित्रपट ब्रह्मास्त्र मध्ये काम करताना दिसून येणार आहे. परंतु त्याला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. तर आलिया भट्ट हिचा गंगुबाई काठियावाडी चे दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांना ही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने आलियाने स्वत:ला आयसोलेट करत आपली कोरोनाची चाचणी करुन घेतली.(Ranbir Kapoor ला कोविड 19 ची लागण? Randhir Kapoor यांनी रणबीर च्या आरोग्याबाबत दिली ही महत्त्वाची माहिती)
अशातच आता आलियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पोस्टमध्ये असे म्हटले की, तिचा कोरोनाचा रिपोर्ट्स निगेटिव्ह आला आहे. आलियाने आपल्या इन्स्टाग्रामवरील स्टोरीत मेसेज पोस्ट करत असे ही म्हटले की, मी तुमच्या सर्वांचे प्रेम आणि चिंतेत तुम्ही असल्याचे मेसेज वाचले. पण आता माझी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आता कामावर परतत आहे.(Ranbir Kapoor ला COVID 19 ची लागण; होम क्वारंटीन असून आजारातून बरा होत असल्याची Neetu Kapoor यांची माहिती)
आलियाने पुढे असे म्हटले की, तुमच्या सर्वांचे आभार आणि धन्यवाद. मी माझी काळजी घेतेय आणि सुरक्षित सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा असेच करा. मास्क घालणे गरजेचे आहे.
आलियाने आपल्या प्रकृतीबद्दल माहिती देत लोकांना मास्क घालण्यासह सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी अपील केले आहे. त्याचसोबत रणबीर याला सुद्धा कोरोनाची लागण झाल्याने आलियाने तिचा 15 मार्चला असणारा वाढदिवसाचा प्लॅन सुद्धा रद्द केला आहे.