Akshay Kumar's Look in Bell Bottom: अक्षय कुमार चा 'बेल बॉटम' चित्रपटातील फर्स्ट लूक आला समोर, सोशल मिडियावर शेअर केला फोटो

अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे आणि निळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये तो लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे

Akshay Kumar Bell Bottom Look (Photo Credits: Twitter)

Akshay Kumar's Look in Bell Bottom: कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीमध्ये शूटिंगसाठी परदेशात गेलेला बेल बॉटम (Bell Bottom) हा पहिला सिनेमा आहे. सर्वांनाच या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) सह अन्य कलाकारांचा या चित्रपटाची सर्वांना उत्कंठा लागून राहिलेली असताना आज खिलाडी अक्षय कुमारने आपल्या सोशल अकाउंटवरुन या चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट काळातील अक्कीचा बेलबॉटम च्या पँटमधील लूक पाहून त्याचे चाहतेही भारावून गेले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील कलाकार आपल्या कुटूंबासह या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला (London) रवाना झाली होती.

अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोमध्ये अक्षयने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे आणि निळ्या रंगाच्या ब्लेजरमध्ये तो लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहे. Bell Bottom चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; पाहा खिलाडी अक्षय कुमारचा हटके अंदाजातील 'Action' व्हिडिओ

या फोटोखाली अक्षयने "बेल बॉटम मंडे स्ले" असे लिहिले आहे. अक्षयचा हा लूक चाहते फार पसंत करत आहेत. बेल बॉटम हा एक स्पाई-थ्रिलर चित्रपट आहे. सूत्रांकडून असेही सांगण्यात 2 शिफ्टमध्ये काम करण्यात येत आहे.

बेल बॉटम हा चित्रपट रंजित तिवारी यांनी दिग्दर्शित केला आहे. अक्षय कुमारसह लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरैशी, प्रोड्यूसर जैकी भगनानी अशी तगडी स्टारकास्ट आहे. कोरोना व्हायरस महामारी मध्ये हा पहिला भारतीय चित्रपट असेल जो विदेशात जाऊन शूट करेल. याचे चित्रिकरण युनायटेड किंग्डमला होणार आहे. बेलबॉटम हा चित्रपट 2 एप्रिल 2021 ला प्रदर्शित होईल.