Prithviraj Film Release on Diwali: अक्षय कुमारचा 'पृथ्वीराज' चित्रपट दिवाळीच्या दिवशी थिएटरमध्ये होणार रिलीज; 'या' चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीखही झाली कन्फर्म

डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमार या चित्रपटात शीर्षकातील भूमिकेत दिसणार आहे.

Prithiviraj (Photo Credits: YRF)

Prithviraj Film Release on Diwali: कोरोना साथीच्या रोगामुळे 2020 मध्ये फिल्म इंडस्ट्रीची आर्थिक स्थिती मंदावली. कोरोनामुळे फिल्म इंडस्ट्रीला कोट्यवधींचा फटका बसला. आता 2021 मध्ये चित्रपट उद्योग पुन्हा एकदा पूर्ण सामर्थ्याने पुनरागमन करण्याची तयारी करत आहे. अशातचं आता चित्रपटांच्या रिलीज तारखांची घोषणा केली जात आहे. यश राज फिल्म्सने 2021 मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार्‍या आपल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या यादीनुसार, 19 मार्च रोजी संदीप और पिंकी फरार चित्रपट सर्वप्रथम चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत. दिबाकर बॅनर्जी यांनी या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, 23 एप्रिल रोजी बंटी आणि बबली चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात सैफ अली खान, राणी मुखर्जी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच शरवरी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन वरुण व्ही शर्मा यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. (वाचा - Jaya Bachchan to Make Comeback: जया बच्चन मराठी चित्रपटाद्वारे करणार मोठ्या पडद्यावर पुनरागमन; तब्बल 7 वर्षांनी दिसणार चित्रपटात)

रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्तचा शमशेरा 25 जूनला रिलीज होणार आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या संजय दत्तच्या बायोपिक संजूनंतर रणबीर या चित्रपटासह मोठ्या पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.

याशिवाय 27 ऑगस्ट रोजी रणवीर सिंगचा चित्रपट जयेशभाई सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दिव्यांग ठाकूर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीरसोबत शालिनी पांडे बमन इराणी आणि रत्न पाठक शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती मनीष शर्मा यांनी केली आहे. यावर्षी रणवीरचा 83 हा चित्रपटही रिलीज होणार आहे.

विशेष म्हणजे 5 नोव्हेंबरला दिवाळीला अक्षय कुमारचा पृथ्वीराज चित्रपट प्रदर्शित होणार आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित पृथ्वीराज या वर्षीच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमार या चित्रपटात शीर्षकातील भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर मानुषी छिल्लर या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि सोनू सूद महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. पृथ्वीराजचा सामना बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूरच्या चित्रपटाच्या जर्सी चित्रपटाशी होणार आहे. यशराज फिल्म्सच्या घोषणानंतर कोणतीही बॅनर फिल्म ओटीटीच्या व्यासपीठावर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif