Lakshmi Bomb: अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या अडचणीत आणखी वाढ; हिंदू सेनेने माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरांना पत्र लिहून 'या' मुद्द्यावरून केली तक्रार
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब' (Lakshmi Bomb) सिनेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपटाला बर्याचदा ट्रोल केले जात असतानाचं आता हिंदू सेनेने (Hindu Sena) लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि प्रमोटर्स यांच्या विरोधात माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Information and Broadcasting Minister Prakash Javadekar) यांना पत्र लिहून तक्रार केली आहे.
Lakshmi Bomb: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay kumar) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर फिल्म 'लक्ष्मी बॉम्ब' (Lakshmi Bomb) सिनेमाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चित्रपटाला बर्याचदा ट्रोल केले जात असतानाचं आता हिंदू सेनेने (Hindu Sena) लक्ष्मी बॉम्ब चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक आणि प्रमोटर्स यांच्या विरोधात माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर (Information and Broadcasting Minister Prakash Javadekar) यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या सिनेमाला हिंदू सेनेने विरोध दर्शविला आहे. राघव लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटामध्ये देवी लक्ष्मीच्या नावाचा वापर करून हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाही, तर देशात कोणत्याही चित्रपटगृहात हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही हिंदू सेनेने दिला आहे.
दरम्यान, हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी सांगितलं की, जर या चित्रपटाचं शीर्षक बदललं नाही, तर चित्रपटाला बायकॉट केलं जाईल. या सिनेमातून देवीचा अपमान करण्याबरोबरचं लव्ह जिहाद (Love Jihad) ला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. (हेही वाचा - Bullets Trailer: 'बुलेट' वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; सनी लिओनी आणि करिश्मा तन्ना च्या हॉट आणि थ्रिलर लूकवर चाहते फिदा; पहा व्हिडिओ)
लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात अक्षय कुमारने मुस्लिम असिफ नावाच्या मुलाची व्यक्तिरेखा साकारली आहे. तसेच यात कियारा अडवाणी हिंदू पात्र साकारताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचं हिंदू सेनेचं म्हणणं आहे. या चित्रपटाच असिफचे पूजावर प्रेम असल्याचं दाखवण्यात आलं आहे. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल करणं सुरू केलं आहे.
अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीचा हा चित्रपट हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट हॉरस्टारवर रिलीज होणार आहे. परंतु आता सर्व सिनेमागृहे अनलॉक होत आहेत. त्यामुळे अक्षयचा लक्ष्मी बॉम्ब चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)