Kesari Song Sanu Kehndi: केसरी सिनेमातील पंजाबी तडका असलेले 'सानू केंदी' गाणे रसिकांच्या भेटीला!

त्यानंतर आता केसरी सिनेमातील पहिलेवहीले गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे.

Kesari Song Sanu Kehndi (Photo Credits: Youtube)

सत्य घटनेवर आधारीत अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) 'केसरी' (Kesari) सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता 'केसरी' सिनेमातील पहिलेवहीले गाणे रसिकांच्या भेटीला आले आहे. 'सानू केंदी' (Sanu Kendi) असे गाण्याचे बोल असून यात आपल्याला अक्षय कुमारचा हटके डान्स पाहायला मिळत आहे. पहा सिनेमाचा ट्रेलर

पंजाबी स्टाईलचे हे गाणे अतिशय मजेदार आहे. ब्रिजेश शांडिल्य आणि रोमी यांनी हे गाणे गायले असून तनिष्क बागचीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे. तर 'सानू केंदी' हे गाणे कुमार याच्या लेखणीतून अवतरले आहे.

अक्षय कुमारने देखील हे गाणे ट्विटरवर शेअर केले.

तुम्हीही पहा हे गाणे-

अक्षय कुमारचा हा नवा सिनेमा सारागड येथील लढाईवर आधारित आहे. या लढाईत 21 शीख सैनिकांनी धैर्य आणि साहसाच्या आधारावर 10,000 अफगाणिस्तान पठाणांचा सामना केला. या सिनेमात अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंग दिग्दर्शित हा सिनेमा 21 मार्चला प्रदर्शित होणार आहे.