अभिनेता अक्षय कुमार याची मुंबई पोलिसांना 2 कोटी रुपयांची मदत; CP परमवीर सिंह यांनी ट्विट करून मानले आभार
अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने मुंबई पोलिसांना दोन कोटी रुपयांची मोठी मदत केली आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस (Mumbai Police) दिवसरात्र मेहनत करत आहेत. अनेकदा सूचना देऊन सुद्धा घरा बाहेर पडणाऱ्या मंडळींना रोखून धरण्याचे आणि या संकटकाळात अडचणीत असणाऱ्यांना मदत करणे या कामात त्यांनी आपल्याला वाहून घेतले आहे. अशावेळी स्वतःच्या जीवाचीही ही मंडळी पर्वा करत नाहीत. याच धैर्याचे कौतुक करत अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) याने मुंबई पोलिसांना दोन कोटी रुपयांची मोठी मदत केली आहे. अक्षयने यापूर्वी देखील मुंबई महानगर पालिकेला (BMC) सुद्धा कोरोनाची चाचणी (Corona Test) करण्यासाठी लागणारे किट्स आणि मास्क च्या खरेदीसाठी तीन कोटींची मदत केली होती. तर PM- केअर्स फंडातही (Pm Cares Fund) 25 कोटींची मदत केली होती.
मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या ट्विटर अकाऊंटवर या मदतीसाठी अक्षयचे आभार मनात एक खास ट्विट करण्यात आले आहे. मुंबई पोलीस दलातील महिला व पुरुष कर्मचारी कोरोना विरुद्ध लढ्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत या सर्वांच्या रक्षणासाठी अक्षय कुमार यांनी दिलेली मदत खूपच फायदेशीर ठरणार आहे त्यासाठी त्यांचे आभार अशा आशयाचे हे ट्विट आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात विद्या बालन हिने निवडला मदतीचा अनोखा मार्ग; Tring सह भागीदारी करत 1000 PPE कीट्स केले दान
पहा ट्विट
दरम्यान, बॉलिवूड मधील अन्यही अनेक कलाकारांनी या कोरोना संकटकाळात मदतकार्य आरंभले आहे. चित्रपट व्यवसायातील अनेक रोजंदारी कामगारांना किराणा पुरवण्यापासून ते कोरोना वॅरियर्सच्या सुरक्षेसाठी पीपीई किट्स पुरवण्यापर्यंत अनेक कामात या सेलिब्रिटी मंडळींनी पुढाकार घेतला आहे. देशात सध्या कोरोनाची 27, 892 प्रकरणे आहेत. या सर्व परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठे वैद्यकीय स्तरावर मोठे प्रयत्न सुरु आहेत.