Viral Video: अक्षय कुमारने फ्रेंडशिप डेच्या दिवशी हातात झाडू घेऊन मित्रांसोबत केला डान्स; पहा मजेशीर व्हिडिओ

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत क्या हुआ तेरा वादा गाताना डान्स करताना दिसत आहे.

Akshay Kumar dance with friends (PC - Instagram)

Viral Video: आज सर्वत्र फ्रेंडशिप डे साजरा होत आहे. त्यानिमित्ताने सामान्य माणूस ते सेलिब्रिटी त्यांच्या मित्रांसाठी सोशल मीडियावर खास संदेश आणि पोस्ट शेअर करत आहेत. दरम्यान, OMG 2 च्या रिलीजसाठी प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यानेही आपल्या मित्रांसोबत एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, जो पाहून तुम्हाला हसायला येईल. या व्हिडिओवर लोकांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आपल्या मित्रांसोबत क्या हुआ तेरा वादा गाताना डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, "मित्रांसोबत मजा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो...वय किंवा स्टेज काहीही असो, माझे मित्र माझ्यातील लहानपण बाहेर आणतात. देव सर्वांना मैत्रीचा आनंद देवो." (हेही वाचा - Rocky Aur Rani Kii Prem Kahaani Box Office Collection: Ranveer-Alia च्या चित्रपटाची 100 कोटीकडे वाटचाल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

विशेष म्हणजे अक्षय कुमारचा OMG 2 म्हणजेच Oh My God 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर चाहतेही चित्रपटाला भरभरून प्रेम देत आहेत.