Akash Ambani Shloka Mehta Wedding: शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, बच्चन कुटुंबीय अवघं बॉलिवूड पोहचलं आकाश-श्लोका यांच्या लग्नाला!
आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा शाही विवाहसोहळा आज वांद्रे येथील बीकेसी परिसरात (BKC Bandra) जियो वर्ल्ड सेंटर (Jio World Centre) येथे पार पडणार आहे.
Akash-Shloka Wedding: आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Shloka Mehta) यांचा शाही विवाहसोहळा आज वांद्रे येथील बीकेसी परिसरात (BKC Bandra) जियो वर्ल्ड सेंटर (Jio World Centre) येथे पार पडणार आहे. संध्याकाळी 7.30 च्या सुमारास हा विवाहसोहळा पार पडेल. मात्र दुपार पासूनच वऱ्हाडी मंडळींनी अंबानी कुटुंबियाच्या या शाही सोहळयाला हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. बॉलिवूड कलाकारांनी या सोहळ्याचा खास उपस्थिती लावली आहे. यामध्ये आमिर खान (Aamir Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), करण जोहर (karan Johar), अयान मुखर्जी, जॅकी श्रॉफ, जुही चावला, रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या सह अनेक कलाकार आणि दिग्दर्शक या शाही विवाह सोहळ्याला उपस्थित आहेत. Akash Ambani Shloka Mehta Wedding: मुंबईतील 'Jio World Centre' वर पोहचले अनिल व मुकेश अंबानी कुटुंबीय (Photos)
भारतीय कलाकारांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरातून टोनी ब्लेअर, गुगलचे सुंदर पिचाई यांनी देखील हजेरी लावली आहे. आकर्षक फुलांची सजावट जियो वर्ल्ड सेंटरला करण्यात आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस आकाश आणि श्लोकाच्या लग्नाचा विवाहसोहळा रंगणार आहे. 11 मार्च दिवशी ग्रँड वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे.