Ajay Devgn Visited Sabarimala Temple: 41 दिवसांचे कठोर व्रत केल्यानंतर अजय देवगणने घेतले शबरीमाला मंदिराचे दर्शन (See Video)
पूजेनंतर अजय देवगण थेट आपल्या कामावर परतला. तो डबिंग स्टुडिओच्या बाहेर, ज्या अवतरता त्याने पूजा केली त्याच अवतारात दिसला. त्यावेळी अजय अनवाणीदेखील होता
नुकतेच, बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) नवा लूक सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये कपाळावर टिळक आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला अजय पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसला होता. त्यानंतर हा त्याचा 'शिवाय 2' मधला लूक असल्याचा अंदाज वर्तवला गेला. मात्र, अजयच्या या लूकमागचे कारण काहीतरी वेगळे होते, जे आता समोर आले आहे. बुधवारी (12 जानेवारी 2022), अजय देवगणने केरळच्या सबरीमाला येथील भगवान अयप्पा स्वामी मंदिराचे (Sabarimala Temple) दर्शन घेऊन प्रार्थना केली.
अजय देवगणने सबरीमाला मंदिराचे दर्शन घेण्यापूर्वी महिनाभर मंदिराचे विधी आणि नियमांचे पालन केले होते. काळ्या पोशाखात, डोक्यावर अरुमुदी केत्तु घेऊन अभिनेटा इतर भाविकांसह पायी मंदिरात पोहोचला आणि दर्शन-पूजा केली. देवस्व मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याला शालही भेट दिली. मंदिराच्या अधिकृत वेबसाइटनुसार, सबरीमालाची तीर्थयात्रा ही इंद्रियांची परीक्षा आहे. यात्रेच्या यशस्वी पूर्ततेसाठी यात्रेकरूंनी 'वृत्तम' म्हणून ओळखले जाणारे साधे धार्मिक जीवन जगणे अपेक्षित आहे.
ETimes च्या मते, अजय देवगणने गेल्या 41 दिवसांपासून कठीण साधना केली. अजय देवगणने स्वामी अयप्पाच्या दर्शनासाठी 41 दिवसांचे उपवासही केले होते. या व्रतामध्ये 41 दिवस ब्रह्मचर्य जीवन जगावे लागते. जमिनीवर झोपावे लागते, नखे कापू नयेत, काळे-पांढरे वस्त्र परिधान करावे लागते, एकवेळ शुद्ध अन्न खावे लागते, खोटेपणा आणि क्रोधापासून दूर राहावे आणि संन्यासीसारखे जीवन जगावे लागते. अजयने 41 दिवस काही विधी पाळले. (हेही वाचा: Manish Malhotra ने डिझाईन केलेल्या ड्रेस मध्ये दिसून आली Malaika Arora, पहा तिचा Bold look)
मात्र अजूनतरी अजय देवगणकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पूजेनंतर अजय देवगण थेट आपल्या कामावर परतला. तो डबिंग स्टुडिओच्या बाहेर, ज्या अवतरता त्याने पूजा केली त्याच अवतारात दिसला. त्यावेळी अजय अनवाणीदेखील होता. दरम्यान, सबरीमाला मंदिर वर्षभरात केवळ नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत भाविकांसाठी खुले असते. उर्वरित महिने ते बंद ठेवले जाते. आता ते 29 डिसेंबरला उघडले असून ते 14 जानेवारीपर्यंत खुले राहणार आहे. 41 दिवस उपवास करणार्या व्यक्तीने प्रथम पंपा त्रिवेणीमध्ये स्नान केल्यानंतर आणि दिवा लावून नदीत प्रवाहित केल्यानंतरच सबरीमाला मंदिरात जावे लागते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)