Tanhaji: The Unsung Warrior चित्रपटासाठी अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खानने घेतले 'इतके' मानधन; वाचून तुम्हालाही बसेल धक्का

परंतु, या चित्रपटासाठी त्यातील कलाकारांनी देखील तितकेच जास्त मानधन घेतले आहे. चला तर पाहूया कोणत्या कलाकाराने घेतली किती कोटी फी.

Tanhaji (Photo Credits: YouTube)

Tanhaji: The Unsung Warrior: या वर्षाच्या सुरुवातीलाच 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' आणि 'छपाक' हे दोन सुपरहिट सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. 'तान्हाजी' ने तर बॉक्स ऑफिसवर जवळपास धुमाकूळच घातला आहे. फक्त तीन दिवसांच्या कालावधीत 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाने 60 कोटींपेक्षाही जास्त कामे केली आहे. त्यामुळेच यावर्षीचा हा सुपरहिट सिनेमा तर ठरणार की काय असं वाटू लागलं आहे. सिनेमाची स्टार कास्ट देखील तितकीच तगडी आहे. अजय देवगण, काजोल, सैफ अली खान या तिन्ही कलाकारांनी अगदी उत्तम काम केलं असल्याचं समीक्षकांचं तसेच प्रेक्षकांचं मत आहे. परंतु, या चित्रपटासाठी त्यातील कलाकारांनी देखील तितकेच जास्त मानधन घेतले आहे. चला तर पाहूया कोणत्या कलाकाराने घेतली किती कोटी फी.

अजय देवगण

अजय देवगणने या चित्रपटात 'तान्हाजी' या मराठा साम्राज्यातील शूरवीरांच्या भूमिका साकारली आहे. अजय ने ही भूमिका इतकी सुंदररित्या साकारली आहे की प्रेक्षकांकडून त्याचे भरभरून कौतुक होताना दिसत आहे. परंतु, अजयने या चित्रपटासाठी स्वीकारलेल्या मानधनाचा आकडा वाचून तुम्हाला नक्कीच हक्क बसेल. या चित्रपटासाठी अजयने तब्बल 30 कोटी रुपये घेतले आहेत.

काजोल

काजोल ने तान्हाजी चित्रपटात तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नी सविस्त्रीबाईंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी काजोल ने 5 कोटी रुपयांचं मानधन घेतलं असल्याचं बोललं जात आहे.

Chhapaak vs Tanhaji Box Office First Day Collection: 'तानाजी' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुरळा; पहिल्या दिवशी 15 कोटींची कमाई करत 'छपाक'ला टाकलं मागं

सैफ अली खान

सैफ अली खानने साकारलेली खलनायकाची भूमिका तुमचं मन नक्कीच जिंकेल. यात तो उदयभानचा भूमिकेत दिसतो. हा वेगळ्या धाटणीचा रोल त्याने अगदी परफेक्ट साकारला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु, त्याने घेतलेल्या मानधनाचा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्याने तब्बल 7 कोटी या चित्रपटासाठी घेतले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif