अजय देवगण-काजोल ची मुलगी न्यासा ला कोरोनाची लागण? अजयने सांगितली खरी हकिगत

Coronavirus in India: अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) ची मुलगी न्यासा देवगन (Nyasa Devgn) च्या संबंधित बातमीने सध्या नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. सोशल मीडियावर न्यासाला कोरोनाची लागण झाली आहे, असं म्हटलं जात आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र, अजयने स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे.

अजय, न्यासा, काजोल (PC - Instagram)

Coronavirus in India: अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) ची मुलगी न्यासा देवगन (Nyasa Devgn) च्या संबंधित बातमीने सध्या नेटकऱ्यांची झोप उडवली आहे. सोशल मीडियावर न्यासाला कोरोनाची लागण झाली आहे, असं म्हटलं जात आहे. ही बातमी ऐकून सर्वांनाचं आश्चर्य वाटतं आहे. मात्र, अजयने स्वत: आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. अजयने या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, विचारणाऱ्यांचे धन्यवाद! परंतु, काजोल आणि न्यासा या दोघांची प्रकृती चांगली आहे.

त्यांच्या आरोग्याविषयी पसरलेली बातम्या खोट्या असून त्याला कोणताही आधार नाही.' अजयने ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांना पत्नी काजोल आणि मुलगी न्यासाची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक कलाकारांनी स्वत: ला होम क्वारंटाईन केलं आहे. सध्या देशात लॉकडाऊन असताना अजय देवगण आणि पत्नी काजोल मुलगी न्यासाला घेऊन अर्ध्यारात्री अचानक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यामुळे अजय आणि काजोलच्या चाहत्यांनी अनेक तर्क लावले. (हेही वाचा - Kanika Kapoor Health Update: कनिका कपूर हिची कोरोना व्हायरसची पाचव्यांदा चाचणी; अजूनही रिपोर्ट्स पॉझिटीव्हच)

 

View this post on Instagram

 

On the Mumbai roads after so long with my baby .... #sunshinyday #daughterlove

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

प्राप्त माहितीनुसार, न्यासाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे काजोल मुलीला घेऊन रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तिला नॉर्मल ताप आल्याचं सांगितलं. परंतु, नेटकऱ्यांनी या बातमीची चुकीची अफवा पसरवली. मात्र, अजयने आज ही निव्वळ अफवा असल्याचं सांगत न्यासाची प्रकृती चांगली असल्याचं म्हटलंय.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now