बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या ची कोव्हिड योद्धांना मानवंदना; ऐश्वर्या राय ने शेअर केला खास फोटो

ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आराध्याने कोव्हिड योद्धांसाठी काढलेले खास चित्र 'my darling Aaradhya’s Gratitude and Love' या कॅप्शनसह शेअर केलं आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या ची कोव्हिड योद्धांना मानवंदना; ऐश्वर्या राय ने शेअर केला खास फोटो
आराध्या पेंटिंग (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये आता डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी देवदूत बनून सामान्यांच्या मदतीला धावून जात आहेत. अशावेळेस या कोव्हिड योद्धांना प्रत्येकजण त्यांच्या क्षमतेनुसार धन्यवाद मानत आहे. बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात, अभिषेक-ऐश्वर्या राय बच्चन यांची लेक आराध्यानेही खास अंदाजामध्ये आभार मानले आहेत. आराध्याने एक खास चित्र रेखाटत 'वॉर व्हर्सेस व्हायरस'च्या युद्धामध्ये आघाडीवर असलेल्या पोलिस, सफाई कर्मचारी, पोलिस यांना मानवंदना देत Stay Home Stay Safe चा संदेश दिला आहे. या खास चित्रामध्ये कोव्हिड योद्धांसोबत शिक्षक, मीडीया कर्मचारी बजावत असलेल्या भूमिकेलाही नमुद केले आहे.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आराध्याचं हे खास चित्र 'my darling Aaradhya’s Gratitude and Love' या कॅप्शनसह शेअर केलं आहे.

आराध्याचं खास चित्र

 

View this post on Instagram

 

✨❤️🌟🇮🇳🌏🌸🥰my darling Aaradhya’s Gratitude and Love ❤️✨🙏

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

कोरोना व्हायरसच्या संकटात समाजात जनजागृती करण्यासाठी अमिताभ बच्चन सुरूवातीपासूनच आघाडीवर होते.त्यांनी सरकारसोबतही या आजाराबाबत समाजात जागृती करण्यासाठी काही जाहिरातींमध्ये काम केले. जनता कर्फ्युच्या संध्याकाळी देखील बच्चन कुटुंबाने एकत्र येऊन कोव्हिड योद्धांचे आभार मानले होते.

(The above story first appeared on LatestLY on May 04, 2020 03:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).