ऐश्वर्या रायला 29 वर्षाचा मुलगा? नक्की काय भानगड आहे ते वाचा

29 वर्षीय मुलगा ऐश्वर्या ही माझी खरी आई असल्याचा दावा करत आहे. नक्की काय भानगड आहे कोणाला कळत नाही आहे.

ऐश्वर्या राय बच्चन ( फोटो सौजन्य- फेसबुक)

बॉलिवूडचे कलाकार ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांनी दहा वर्षांपूर्वी लग्न केले होते. तसेच ऐश्वर्याची मुलगी आराध्या ही आता पाच वर्षांची झाली आहे. मात्र अचानक आंध्र प्रदेशातील एक 29 वर्षीय मुलगा ऐश्वर्या ही माझी खरी आई असल्याचा दावा करत आहे. नक्की काय भानगड आहे कोणाला कळत नाही आहे.

विशाखापट्टण मध्ये राहणारा संगीथ कुमार असे या मुलाचे नाव आहे. तसेच त्याने ऐश्वर्या ही माझी आई आहे हे मीडियासमोर सांगितले आहे. 1988 रोजी ऐश्वर्याने मला जन्म दिल्याचा दावा संगीथ करत आहे. तसेच आयव्हीएफच्या मदतीने मी जन्मलो असल्याचे ही त्याने सांगितले आहे. तर संगीथने त्याचे आजी- आजोबा वृंदा आणि कृष्णराज राय यांनी माझा सांभाळ केला आहे. एवढच नसून हे सत्य लपविण्यासाठी सर्व पुरावे नष्ट करण्यात आले असल्याचा दावा संगीथने मीडियासमोर केला आहे.

त्यामुळे गेली 29 वर्षे, 'मला ऐश्वर्या पासून दूर ठेवण्यात आले आहे'. मात्र आता मला आईसोबत राहयाचे असल्याचे संगीथ याचे म्हणणे आहे'. या सर्व प्रकारानंतर संगीथची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तेव्हा संगीथ हा मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. तसेच ऐश्वर्याचा मुलगा म्हणवणारा संगीथ हा स्वत:ला ए. आर. रेहमान यांच्या शिष्य असल्याचे ही सांगत फिरत आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

SC On Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; शो सुरू करण्याची मिळाली परवानगी

Chhava OTT Release Date: छावा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट

Cryptocurrency Fraud Case: 'खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल प्रसारित करू नका'; तमन्ना भाटियाने नाकारला 2.4 कोटी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सी फसवणूक प्रकरणातील सहभाग

Kiara Advani Pregnancy Post: सिद्धार्थ मल्होत्राच्या घरात होणार छोट्या पाहुण्याचे आगमन; कियारा अडवाणीने खास फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

Share Now