Aamir Khan Reaction To Jhund: 'झुंड' चित्रपट पाहून आमिर खान झाला भावूक, म्हणाला - तुम्ही ज्या पद्धतीने काम केले...

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांपैकी आमिरने या चित्रपटाचे भरपुर कौतुक केले आहे. याशिवाय आमिरने चित्रपटात काम करणाऱ्या मुलांचेही कौतुक केले आहे.

Jhund (Photo Credit - YouTube)

आमिर खान (Amir Khan) अशा अभिनेत्यांपैकी एक आहे जो इतर स्टार्सच्या चित्रपटांवरही आपली प्रतिक्रिया देतो. आता आमिरने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा "झुंड" (Jhund) हा चित्रपट पाहिला असून त्यावर त्याची प्रतिक्रिया आली आहे. हा व्हिडिओ T-Series ने आपल्या YouTube चॅनलवर शेअर केला आहे. अमिरने चित्रपटाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि निर्माता भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्याशी संवाद साधताना आमिर म्हणाला की, 20-30 वर्षांत आम्ही जे काही शिकलो या सर्व गोष्टींचा यांनी फूटबॉल केलाय, असं म्हणता येईल. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांपैकी आमिरने या चित्रपटाचे भरपुर कौतुक केले आहे. याशिवाय आमिरने चित्रपटात काम करणाऱ्या मुलांचेही कौतुक केले आहे.

आमिर म्हणाला, माझ्याकडे शब्द नाहीत

व्हिडिओमध्ये आमिर म्हणतो, काय चित्रपट आहे यार....खुप मस्त. यावेळी आमिरही भावूक होतो. प्रत्यक्षात असे काही घडले की झुंड चित्रपटाचे प्रायव्हेट स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. खासगी स्क्रीनिंगमध्येच या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले. आमिर म्हणाला, माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही मुली आणि मुलांच्या भावना ज्या प्रकारे टिपल्यात ते अप्रतिम आहे. मुलांनी ज्या प्रकारे काम केले ते देखील अविश्वसनीय आहे.  हा चित्रपट पूर्णपणे आश्चर्यचकित करणारा आहे. या चित्रपटाचा प्रेक्षकांवर दीर्घकाळ प्रभाव पडेल असेही आमिर म्हणाला. (हे ही वाचा Jhund: "झुंड" चित्रपटासाठी बिग बींनी घेतलं कमी मानधन, म्हणाले - माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर पैसे खर्च करू)

"झुंड" त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे

अमिताभ बच्चन यांच्याबद्दल आमिर म्हणाला, ते करत असलेले काम जबरदस्त आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. पण झुंड त्याच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. यानंतर आमिर उभा राहतो आणि सगळ्यांसाठी टाळ्या वाजवतो आणि जेव्हा चित्रपटाचे कलाकार रुम मध्ये येतात तेव्हा तो त्यांना मिठी मारतो. त्यानंतर तो सगळ्यांना आपल्या घरी बोलावतो आणि सगळ्यांना त्याचा मुलगा आझाद राव खान याच्याशी भेट करुन देतो.