Madhuban Song Controversy: नरोत्तम मिश्रा यांच्या इशाऱ्यानंतर सारेगामा 'मधुबन' गाण्याचे बोल आणि नाव हटवणार

पुढील 3 दिवसात ते नवीन गाण्याने बदलले जाईल.

Sunny Leoni (Photo Credit - Instagram)

म्युझिक कंपनी 'सारेगामा (Saregama)'ने रविवारी जाहीर केले आहे की कंपनी नव्याने रिलीज झालेल्या 'मधुबन' (Madhuban Song) गाण्याचे बोल आणि नाव बदलणार आहे. मध्य प्रदेशचे (MP) गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांच्या विधानानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे, ज्यात त्यांनी म्हटले होते की या गाण्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी रविवारी सनी लिओनला, (Sunny Leoni) गायकांना आणि अभिनेत्रींना इशारा दिला होता आणि त्यांना माफी मागण्यासही सांगितले. 'सारेगामा'ने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'देशवासीयांच्या प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करत आम्ही 'मधुबन' गाण्याचे बोल आणि नाव तीन दिवसांत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील 3 दिवसात ते नवीन गाण्याने बदलले जाईल. सारेगामाने 22 डिसेंबरला मधुबन गाणे आपल्या यूट्यूब चॅनलवर रिलीज केले. या गाण्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती.

Tweet

नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्याबाबत पत्रकाराला सांगितले होते की, 'काही पाखंडी लोक सातत्याने हिंदूंच्या भावना दुखावत आहेत. 'मधुबन में राधिका नाचे' या नव्या गाण्याच्या माध्यमातून असेच पाऊल उचलण्यात आले आहे. मधुबन हे गाणे रिलीज होताच त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सनी लिओनीचे मधुबन हे गाणे नुकतेच रिलीज झाले होते, जे कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सांधूसंत आणि पुरोहितांनी केला होता. (हे ही वाचा अक्षय-सारा आणि धनुषच्या 'अतरंगी रे'ने केला विक्रम, Hotstarवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट.)

या वर्षी ऑक्टोबरमध्ये नरोत्तम मिश्रा यांनी फॅशन आणि ज्वेलरी डिझायनर सब्यसाची यांच्या मंगळसूत्रावरील जाहिरातीत महिलांचे चित्रण करण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. याच्या काही दिवसांपूर्वी त्याने एका ब्लीच कंपनीला ती जाहिरात मागे घेण्यासही सांगितले ज्यामध्ये समलिंगी जोडपे दाखवले होते. त्यांनी कंपनीला ताकीद दिल्यानंतर  ती जाहिरात मागे घेण्यात आली.



संबंधित बातम्या