Vivek Agnihotri Travel In Mumbai Metro: Hrithik Roshan नंतर विवेक अग्निहोत्रीने केला मुंबई मेट्रोने प्रवास; सोशल मीडियावर सांगितला अनुभव
विवेक अग्निहोत्री यांनीन त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मुंबई मेट्रोच्या डब्यात एकटाच बसलेला दिसत होता. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सकाळी मेट्रोने प्रवास केला.
Vivek Agnihotri Travel In Mumbai Metro: 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सिन वॉर' मधून लोकांमध्ये आपली छाप पाडणारे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी आज म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रोने प्रवास केला. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रवासाची आणि अनुभवाची एक झलक सर्वांसोबत शेअर केली आहे. चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या प्रवासाचा एक फोटो शेअर केला आहे. आता चाहतेही या फोटोवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
विवेक अग्निहोत्री यांनीन त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो मुंबई मेट्रोच्या डब्यात एकटाच बसलेला दिसत होता. गर्दी टाळण्यासाठी त्यांनी सकाळी मेट्रोने प्रवास केला. हा फोटो शेअर करताना चित्रपट निर्मात्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रस्त्याने 50-60 मिनिटांच्या तुलनेत केवळ 12 मिनिटांत वर्सोवा विमानतळ. हे अधिक वेळा करण्याचे नियोजन.' (हेही वाचा - Bollywood News: ह्रतिक रोशन मेट्रोतून करतोय प्रवास, चाहत्यांसोबत काढले फोटो)
विवेक अग्निहोत्रीने ही पोस्ट शेअर करताच. यावर त्याच्या चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. काही युजर्सना त्याची ही पद्धत आवडली, तर काहींना त्याचा फोटो पाहून राग आला. एका युजरने कमेंट करत लिहिले की, 'सेलिब्रेटींना अशा प्रकारे सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना पाहून आनंद झाला'. यासोबतच फोटोमध्ये फोटोग्राफरला पाहिल्यानंतर दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'तुम्ही फोटोग्राफरला घेऊन फिरता'.
Airport to Versova in just 12 minutes as compared to 50/60 minutes by road. Planning to take it more often. #Mumbai pic.twitter.com/LBHhnMybYL
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 14, 2023
दरम्यान, विवेक अग्निहोत्रीच्या आधी अभिनेता हृतिक रोशननेही शुक्रवारी मुंबई मेट्रोने प्रवास केला होता. ज्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. या प्रवासादरम्यान, त्याचे चाहते मेट्रोमध्ये अभिनेत्यासोबत फोटो क्लिक करताना दिसले. हृतिक रोशन लवकरच 'फाइटर' चित्रपटात दिसणार आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही दिसणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 14, 2023 12:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

