अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन; उपचारादरम्यान Criticare Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास

वयाच्या 72 व्या वर्षी फुफ्फुसं आणि हृदय कमकूवत झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे.

विद्या सिन्हा (Photo Credits: Wikimedia Commons)

अभिनेत्री विद्या सिन्हा (Vidya Sinha) यांचे आज (15 ऑगस्ट) मुंबईच्या क्रिटीकेअर रुग्णालयात (Criticare Hospital) निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी फुफ्फुसं आणि हृदय कमकूवत झाली असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचं दुपारी 12 च्या सुमारास निधन झालं आहे. रजनीगंधा, छोटी छोटी बात, पती पत्नी और वो ते सलमान खानच्या (Salman Khan) बॉडीगार्ड सिनेमामध्ये विद्या सिन्हा यांनी काम केले होते. काव्यांजली, कबुल है, इश्क का रंग सफेद या हिंदी मालिकांमधील विद्या सिन्हा यांचे काम विशेष गाजलं.  RIP Vidya Sinha: रजनीगंधा, जानेमन जानेमन.. विद्या सिन्हा यांची ही बॉलिवूडमधील 5 गाणी आजही आहेत लोकांच्या ओठांवर (Watch Video)

विद्या यांना आठवडाभरापूर्वी जुहू येथील क्रिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती नाजूक आणि चिंताजनक होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या तब्येतीत काहीशा सुधारणा असल्याच्या दिसून आल्या होत्या. मात्र व्हेंटिलेटर काढल्यानंतर त्यांना श्वासोच्छवास करायला त्रास होत होता. मागील 3 महिन्यांपासून त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी दिला होता. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. काही दिवसांपूर्वीच हृतिक रोशन याचे आजोबा आणि चित्रपट निर्माते जे. ओम प्रकाश या बॉलिवूड सेलिब्रिटीच्या निधनाने सिनेसृष्टी हळहळली होती.

विद्या यांनी बॉलिवूडमध्ये 70 रीचा काळ गाजवला होता. राजा काका या चित्रपटाने त्यांनी पदार्पण केलं. पण या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आलेल्या रजनिगंधा या दुस-या चित्रपटाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी दाद दिली आणि त्याच्या फिल्मी करियरला वेग आला. अनेक दर्जेदार भूमिका साकारलेल्या विद्या सिन्हा यांनी80 च्या दशकात परदेशात जाऊन बॉलिवूडला अलविदा म्हटलं होतं.