दाक्षिणात्य अभिनेत्री राकुल प्रीत सिंह ने भिंतीवर उलटं लटकून घातला टी-शर्ट; पहा व्हायरल व्हिडिओ

जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री राकुल प्रीत सिंह ने भिंतीवर उलटं लटकून टी-शर्ट घातला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री राकुल प्रीत सिंह ने भिंतीवर उलटं लटकून घातला टी-शर्ट; पहा व्हायरल व्हिडिओ
Rakul Preet Singh (PC - Twitter)

जगातील सर्व देशांना कोरोना व्हायरसने (Coronavirus) विळखा घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले आहे. या लॉकडाऊन दरम्यान, अनेक कलाकार आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री राकुल प्रीत सिंह ने (Rakul Preet Singh) भिंतीवर उलटं लटकून टी-शर्ट (T-Shirt) घातला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

राकुल प्रीत सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. सामान्य पद्धतीनं कपडे घालून खूप कंटाळा आला होता. त्यामुळे ही नवी स्टाइल ट्राय करत आहे. तुमच्यासाठीही हा एक टास्क आहे. नक्की ट्राय करा, असं कॅप्शन देत टास्क करून दाखवण्याचं आवाहन केलं आहे. राकुलने शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तसेच राकुलचा हा टास्क तिच्या अनेक चाहत्यांना आवडला आहे. (वाचा - 'हे आपल्या दुष्कर्माची फळं आहेत': कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे धर्मेंद्र झाले निराश; पहा व्हिडिओ)

या व्हिडिओमधून राकुलचा फीटनेस पाहायला मिळत आहे. राकुलचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने राकुल घरीचं व्यायाम करत असून स्वत: ला फिट ठेवत आहे. राकुल प्रीतने समाजभान जपत 200 कुटुंबीयांच्या दोन वेळच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत राकुल या गरीबांना जेवण देणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 11, 2020 11:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).