Pallavi Joshi Accident : अभिनेत्री पल्लवी जोशी यांना 'द वॅक्सीन वॉर' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दुखापत

'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri) आणि निर्माता अभिषेक अग्रवाल 'द वॅक्सीन वॉर' चित्रपटाची निर्मिती करत आहेत.

Pallavi Joshi (Photo Credits: Facebook)

'द वॅक्सीन वॉर' (The Vaccine War) चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांना दुखापत झाली आहे. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ( Vivek Agnihotri) आणि निर्माता अभिषेक अग्रवाल 'द वॅक्सीन वॉर' चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद येथे सुरु असताना त्यांना दुखापत झाली.  'द कश्मीर फाइल्स' चित्रपट प्रचंड वादग्रस्त ठरला होता. चित्रपटाचे कौतुकही झाले. परंतू, 'द्वेश भडकवणारा चित्रपट' अशी टीकाही या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात झाली.

सेटवरील सूत्रांच्या हवाल्याने झीन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री पल्लवी जोशी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच त्यांना दुखापत झाली. दुखापत किती गंभीरआहे याबाबत मात्र माहिती मिळू शकले नाही. (हेही वाचा, अभिनेत्री पल्लवी जोशी हिच्या Credit Card वर सायबर चोरांचा डल्ला)

सूत्रांनी सांगितले की, एक वाहन चालवताना पल्लवी जोशी यांना अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. दुखपात झाली असतानाही पल्लवी जोशी यांनी चित्रिकरणात असलेल्या त्यांचा प्रसंग पूर्ण केला. नंतर त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे समजते.