Nushrratt Bharuccha Stuck In Israel: अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली; टीमने सांगितलं, संपर्क होऊ शकला नाही
टीमने सांगितले की, आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे की ती निरोगी आणि सुरक्षित परतेल. नुसरत लवकर सापडली नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत घेतली जाऊ शकते.
Nushrratt Bharuccha Stuck In Israel: पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील (Israel) वातावरण तापले आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Hamas) ने इस्रायलवर हल्ला केला, त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरूच आहे. दरम्यान, नुसरत भरुचाबाबत (Nushrratt Bharuccha) एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात ही अभिनेत्री इस्रायलमध्ये अडकली आहे. खुद्द नुसरतच्या टीममधील एका सदस्याने ही माहिती दिली असून अभिनेत्रीच्या संपर्काबाबतच्या वक्तव्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
नुसरत भरुचाच्या टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दुर्दैवाने नुसरत इस्रायलमध्ये अडकली आहे. हैफा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी ती तिथे गेली होती. टीम सदस्याच्या म्हणण्यानुसार, शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मी तिच्याशी शेवटचा संपर्क साधला, तेव्हा ती तळघरात सुरक्षित होती. सुरक्षा उपायांसाठी, अधिक तपशील उघड करणे शक्य नाही. मात्र, तेव्हापासून आमचा संपर्क होऊ शकलेला नाही. (हेही वाचा -Israel-Palestine War Escalates: इस्त्रायलवर हमासचा हल्ला, 300 हून अधिक ठार)
टीमने सांगितले की, आम्ही नुसरतला सुखरूप भारतात परत आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आशा आहे की ती निरोगी आणि सुरक्षित परतेल. नुसरत लवकर सापडली नाही तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मदत घेतली जाऊ शकते.
दरम्यान, हमासने अचानक इस्रायलवर मोठा हल्ला केला आणि एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे डागली. यामुळे इस्रायलमधील 300 हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच 1000 लोक जखमी झाले. हमासच्या अतिरेक्यांनी गाझा पट्टीतून इस्रायलवर 5,000 हून अधिक रॉकेट डागल्याचे वृत्त आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)