'नाच-गाणे' करणारी महिला असा उल्लेख करणाऱ्या कॉंग्रेस आमदाराला अभिनेत्री Kangana Ranaut चे सडेतोड उत्तर; 'मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही... मी राजपूत आहे'
मी अशी एकमेव अभिनेत्री आहे जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला
गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री कंगना रनौतची (Kangana Ranaut) सोशल मिडियावर जोरदार चर्चा आहे. आपल्या वक्तव्यांमुळे ती नेहमीच माध्यमांना खाद्य पुरवत असते. आताही असेच एक नवे प्रकरण समोर आले आहे. नुकतेच माध्यम आणि कार्यकर्त्यांशी बोलताना मध्य प्रदेशचे कॉंग्रेसचे आमदार सुखदेव पानसे (Sukhdev Panse) यांनी अभिनेत्री कंगना रनौत आणि सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी कॉंग्रेसच्या आमदारांनी कंगना राणौतचा उल्लेख ‘नाच-गाणे करणारी महिला’ असा केला. यासह कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केला असेही ते म्हणाले. आता यावर प्रतिक्रिया देताना, ‘मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही...’ असे कंगना म्हणाली आहे.
कंगना राणौतचा चित्रपट धाकडविरोधात निषेध नोंदवणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईबद्दल, बेतुल जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदवण्यासाठी आलेले माजी मंत्री म्हणाले की, ‘जुगार आणि सट्टा खुलेआम चालू आहे, परंतु त्याविरोधात पोलिसांची कोणतीही कारवाई केली जात नाही, परंतु जेव्हा आमच्या कार्यकर्त्यांनी कंगना राणौतसारख्या नाच-गाणे करणाऱ्या महिलेविरोधात शांततेत निषेध केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.’
आता यावर प्रतिक्रिया देताना कंगना रनौतने ट्वीट केले आहे की, ‘हा जो कोणी मूर्ख आहे त्याला माहित आहे का, मी दीपिका, कतरिना किंवा आलिया नाही... मी अशी एकमेव अभिनेत्री आहे जिने आयटम नंबर करण्यास नकार दिला, मोठे नायक (खान/कुमार) यांच्यासोबत चित्रपट करण्यास नकार दिला. यामुळेच संपूर्ण बॉलिवूडमधील पुरुष + स्त्रिया माझ्या विरोधात झाले. मी एक राजपूत महिला आहे, मी हाडे मोडते.’ आता कंगनाचे हे ट्वीट व्हायरल होत आहे. (हेही वाचा: हेल्मेट आणि मास्क न घालता बाईक चालवल्याने बॉलिवूड अभिनेता Vivek Oberoi वर मुंबई पोलिसांची कारवाई)
दरम्यान, याआधी शेतकरी चळवळीबद्दल कंगनाने हिंसाचार करणारे शेतकरी दहशतवादी असल्याचे ट्विट केले होते. तेव्हापासून कॉंग्रेसने हा मुद्दा बनविला आहे. कंगनाच्या या विधानानंतर बैतूल जिल्ह्यात कॉंग्रेसने सलग दोन दिवस निषेध केला होता आणि कंगनावर माफी मागण्यासाठी दबाव आणला होता. पण कॉंग्रेसने सर्व प्रयत्न करूनही कंगनाने माफी मागितली नाही.