आलिया भट्ट हिने महेश भट्ट यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'तुम्ही एक उत्तम व्यक्ती असून कधीही कोणच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका' असे म्हणत केली भावूक पोस्ट

आलिया भट्ट हिने महेश भट्ट यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'तुम्ही एक उत्तम व्यक्ती असून कधीही कोणच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका' असे म्हणत केली भावूक पोस्ट
आलिया भट्ट आणि महेश भट्ट (Photo Credits- Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्ट हिने तिचे वडील महेश भट्ट यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. महेश भट्ट यांनी आज त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा केला आहे. या खास क्षणी आलिया हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर भावूक होत एक मेसेज शेअर करत वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने पोस्ट मध्ये तिच्या लहानपणीचा फोटो शेअर करत त्यांना 'मुसाफा असे म्हणून संबोधले आहे.(Kareena Kapoor ने कोविड योद्धाना Anti-Microbial T-shirts देत व्यक्त केला त्यांच्या परिश्रमांबद्दल आदर!)

आलिया हिने इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून त्यात एकदम क्यूट आणि गोलूमोलू दिसून येत आहे. तिच्यासोबत महेश भट्ट सुद्धा फोटोत दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत एक स्केच आर्ट असून त्यात एक लहान मुलगी सिंहाला किस करताना दिसून येत आहे. आलियाने हा फोटो शेअर करत वडिलांना ते तिच्यासाठी मुसाफा असल्याचे म्हटले आहे. या फोटोला कॅप्शन देत आलियाने असे म्हटले आहे की, माझ्याकडे आज बोलण्यासाठी काहीच नाही आहे. या वर्षात आपली वेळ एका कॅप्शनमध्ये बसण्यासाठी खुपच आहे. पण एक गोष्ट जरुर बोलीन की, आमच्या आवडीच्या चित्रपटांमधील काही तुम्ही तुमच्याकडे पहा. तुम्ही त्याहून अधिक आहात. लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात. लक्षात ठेवा! शुभेच्छा मुसाफा. तुम्ही एक उत्तम व्यक्ती आहात. तुम्ही कधीच कोणच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका असे ही आलिया हिने पोस्ट मध्ये लिहिले आहे. आलियाची ही पोस्ट सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. दुसऱ्या बाजूला तिच्या चाहत्यांनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Sadak 2: आलिया भट्ट-संजय दत्त चा चित्रपट 'सडक 2' ठरला IMDB चे सर्वात कमी रेटिंग मिळालेला सिनेमा)

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणी महेश भट्ट यांना सोशल मीडियात खुप ट्रोल करण्यात आले. तसेच बॉलिवूड क्विन कंगना रनौत हिने सु्द्धा ट्वीटरच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर टीका केली. ऐवढेच नाही तर महेश भट्ट यांचा चित्रपट सडक-2 ला निगेटिव्ह पब्लिसिटी मिळाली.

कामाबद्दल बोलायचे झाल्यास आलिया भट्ट अयान मुखर्जी दिग्दर्शित चित्रपट ब्रम्हास्र मध्ये रणबीर कपूर याच्यासोबत भुमिकेत दिसून येणार आहे. तर संजय लिला भंसाली यांचा चित्रपट गंगुबाई काठियावाडी मध्ये सुद्धा आलियाचा एक वेगळाच अंदाज दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2020 08:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).