वादग्रस्त Exit Poll Memes वर 'विवेक ओबेरॉय' ची माफी, ट्विटही हटवले
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बायोपिकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेला अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) याने काल आपल्या ट्विटर अकाउंट वरून अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) हिचा सलमान खान (Salman Khan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि स्वतःसोबतचा फोटो असलेला मीम शेअर केला होता.यावरून सोशल मीडीवर बरेच वाद सुरु झाले इतकंच नव्हे तर महाराष्ट्र राज्य व देशातील महिला आयोगाने (Women Commission) विवेकच्या विरुद्ध तक्रार देखील नोंदवली होती मात्र आता या मीम मुळे जर कोणाचा अपमान झाला असेल तर माफ करा असे म्हणत विवेकने ट्विटर वरून माफी मागून मीम हटवले आहे.
विवेक ओबेरॉय ट्विट
निवडणुकांच्या व एग्झिट पोल च्या पार्श्वभूमीवर केलेल्या या मीममध्ये ऐश्वर्या आणि सलमान चे संबंध हे ओपिनियन पोल सारखे तर विवेक आणि ऐश्वर्याचे संबंध हे एग्झिट पोल सारखे आहेत मात्र अभिषेक ऐश्वर्या यांचं लग्न हा मूळ निकाल आहे असे म्हंटले आहे. सलमान आणि विवेक सोबत ऐश्वर्याचे प्रेमसंबंध बॉलिवूड मध्ये याआधीही बरेच गाजले होते. पण यावेळेस कोण्या नेटकऱ्याने बनवलेले हे मीम शेअर करणं विवेक ओबेरॉयच्या चांगलंच अंगाशी आलंय. 'एक्झिट पोल' वरुन ऐश्वर्या-सलमान यांचा फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यामुळे विवेक ओबेरॉय वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोग कारवाई करण्याची शक्यता
मीम शेअर केल्याप्रकरणी इतक्या तीव्र प्रतिक्रिया पाहून विवेक ने ANI या वृत्तसंस्थेशी संवाद साधला, ज्यात त्याने आपली काहीही चूक नाही किंवा चूक असल्यास त्या फोटोशी संबंधित असेलेली मंडळी माझ्याशी थेट बोलू शकतील, यामध्ये राजकारण घुसवून उगाच वेगळं वळण देण्याची कोणाला गरज नाही असे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या युवा कार्यकर्तीला ममता दीदींचा मीम शेअर केल्यासाठी अटक करण्यात आली होती. तशीच मला देखील अटक करण्याची मागणी होत आहे पण या मागचा हेतू हा माझ्या फिल्म साठी अडथळे निर्माण करून फिल्म बंद पाडणं इतकाच असल्याचे देखील विवेकने म्हंटले.
ANI ट्विट
महिला आयोगाने या प्रकरणाबद्दल विवेक ओबेरॉयला माफी मागायला सांगितल्यावर, आपण माफी मागायला तयार आहोत मात्र आपली चूक या विभागाने दाखवून द्यावी यासाठी मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या भेटून चर्चा करायला देखील तयार आहे तसेच आपण पहिल्यांदा पाहून ज्या गोष्टी आपल्याला विनोदी वाटतात त्या कदाचित इतरांना आक्षेपार्ह्य वाटू शकतात, मागच्या दहा वर्षांपासून मी महिला सबलीकरणसाठी काम करत आहे कोणत्याही महिलेचा अपमान मी कधीही करणार नाही अशी प्रतिक्रिया विवेकने दिली .
ANI ट्विट
दरम्यान महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फ़े विवेकला नोटीस देण्यात आली असून त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून मीम हटवण्यात आले आहे.